घरमहाराष्ट्रकरोनामुळे शेकडो वर्षे जुनी परंपरा तुटली; नाथषष्ठी सोहळा स्थगित

करोनामुळे शेकडो वर्षे जुनी परंपरा तुटली; नाथषष्ठी सोहळा स्थगित

Subscribe

औरंगाबादच्या पैठण येथे होणारा 'संत एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळा' पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे. राज्यात करोनची साथ पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औरंगाबादच्या पोलीस विभागाने हे आदेश दिले आहेत.

चीनमधून आलेल्या करोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. भारतातही करोना रुग्णांची संख्या ४६ वर गेली आहे. महाराष्ट्र्रात करोनाचा एकही रुग्ण नसल्याचे काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र आता राज्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी पुण्यात दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता राज्यात भीतीचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या पैठण येथे होणारा ‘संत एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळा’ स्थगित करण्यात आला आहे. राज्यात करोनची साथ पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. १२ मार्च ते १६ मार्चदरम्यान हा सोहळा होणार होता. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे ७ ते ८ लाख भाविक येणार होते. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून हा सोहळा स्थगित करण्यात आला आहे.

शेकडो वर्षे जुनी परंपरा तुटली

‘श्री एकनाथ षष्ठी’ हा दिवस एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमधील नाथषष्ठी सोहळा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून ओळखली जाते.  पंढरपूर यात्रेखालोखाल लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. मुख्य पालखीसोबत अंदाजे ६०० दिंड्या राज्यभरातून येथे येतात. ही परंपरा जवळपास ३५० वर्षांपासून चालू होती, मात्र करोनोच्या साथीमुळे पहिल्यांदाच ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिकमधील  विपश्यना केंद्रही बंद 

करोना व्हायरसमुळे नाशिकच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्रालाही तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विपश्यना केंद्रात देश-विदेशातून दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. सध्याची परिस्थिती पाहता जगभरात करोना झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांमुळे करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता या विपश्यना केंद्रात डिसेंबर महिन्यापर्यंत कोणतेही शिबीर होणार नाही, तसेच याअगोदर शिबिरासाठी करण्यात आलेल्या सर्व बुकिंग्स रद्द करण्यात आल्या आहेत.

अशी घ्या काळजी

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कुठल्याही धार्मिक कार्यक्रम, संमेलन, लग्न समारंभ घेणे टाळावे व गर्दी होणार नाही असे प्रसंग टाळावे, जेणेकरुन करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध होईल. तसेच शक्यतो हस्तांदोलन करणे टाळावे, शिंकताना, खोकतांना व्यक्तीगत स्वच्छतेकडे योग्य ती काळजी घेत सतर्क रहावे.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाला घाबरून पुण्यात IT कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -