घरमुंबईखड्ड्यांनंतर कल्याण डोंबिवलीकर धुळीने त्रस्त

खड्ड्यांनंतर कल्याण डोंबिवलीकर धुळीने त्रस्त

Subscribe

रस्त्यावरील खड्ड्याच्या समस्येने कल्याण डोंबिवलीकर मेटाकुटीला आले असतानाच आता पावसाने उसंत घेतल्याने खड्ड्यांतील माती व खडी रस्त्याबाहेर आली आहे. त्यामुळे खड्ड्यांबरोबरच धुळीच्या त्रासाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर खड्डे बुजविण्याच्या काम सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून कडाक्याचे ऊन पडले असतानाही प्रशानाने कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे धुळीने नागरिक बेजार झाले आहेत.

कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गाजला. सेलिब्रेटीपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. मात्र, प्रचंड पडलेल्या पावसामुळे जास्त प्रमाणात खड्डे पडल्याचे खापर फोडीत प्रशासनाने हात झटकले आहे. शहरातील एकही रस्ता असा नाही की त्यावर खड्डे नाहीत. त्यामुळे वाहनचालक व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पालिका व लोकप्रतिनिधींवर सर्वच स्थरातून टीकेची झोड उठवल्यानंतर पालिका प्रशासनाने खड्ड्यात माती व खडी टाकून बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने उघडीप घेतल्याने खड्ड्यातील माती निघून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बालकांना खोकला सर्दी असे आजाराचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरत असल्याने अपघात होण्याचा धोका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -