घरमुंबईकूपर रुग्णालयात ‘कांगारु मदर केअर’ युनिट कार्यान्वित; नवजात शिशुंना विशेष सुविधा

कूपर रुग्णालयात ‘कांगारु मदर केअर’ युनिट कार्यान्वित; नवजात शिशुंना विशेष सुविधा

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्‍तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये अधिष्‍ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या विशेष प्रयत्‍नाने व ‘अॅक्‍शन अगेन्‍स्‍ट हंगर’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या सहकार्याने नवजात शिशू अतिदक्षता विभागात ‘कांगारु मदर केअर’ युनिट सुरु करण्‍यात आले आहे. (Kangaroo Mother Care unit operational at Cooper Hospital Special facilities for newborns)

या युनिटच्‍या उद्घाटनाप्रसंगी, अॅक्‍शन अगेन्‍स्‍ट हंगर संस्‍थेचे अध्‍यक्ष अश्विनी कक्‍कर तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. उल्‍हास वसावे, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्‍या (एनआयसीयू) प्रमुख डॉ.चारुशीला कोरडे हे उपस्थित होते.
कूपर रुग्‍णालयाच्‍या नवजात शिशू अतिदक्षता विभागामधील या युनिटमुळे येथे दाखल झालेल्‍या नवजात शिशुंना वैद्यकीय उपचारासोबतच इतर विशेष सेवा देता येणार आहेत.

- Advertisement -

शिशुंच्‍या सर्वांगीण आरोग्‍याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच, कुपोषणामुळे संभाव्य इतर आजारांचे धोके कमी होऊन आणि मातेचे सुद्धा शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुधारेल. कमी वजनाचे व अपु-या दिवसाचे नवजात शिशू यांच्‍यामध्‍ये स्थिर उबदार तापमान तसेच जलद गतीने वजन वाढ होण्‍यास मदत होते. यामुळे या बाळांना रुग्‍णालयातून लवकर सुट्टी देण्‍यास मदत होते. कांगारु मदर केअर युनिटमधील दृकश्राव्य संचाद्वारे मातेला बाळाच्‍या प्रकृतीची योग्‍य काळजी व देखभाल घेण्‍याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.


हेही वाचा – हसन मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा; अटकपूर्व जामीनावरील निकाल 5 एप्रिलला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -