घरमुंबईकस्तुरबा लॅबची चाचणी क्षमता येत्या बुधवारपर्यंत वाढवणार

कस्तुरबा लॅबची चाचणी क्षमता येत्या बुधवारपर्यंत वाढवणार

Subscribe

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

करोना विषाणूंचा प्रादुर्भावर लक्षात घेता कस्तुरबा हॉस्पिटलमधील लॅबची क्षमता येत्या बुधवारपर्यंत वाढवण्यात येणार असून प्रतिदिन ३५० चाचण्या होतील, अशा मशिन तेथे बसवणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले. त्यातप्रमाणे जे. जे. हॉस्पिटल, हाफकिन्स येथे येत्या १० ते १५ दिवसांत नव्या लॅब सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 9 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची भेट घेतली आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या 32 पैकी 9 रुग्णांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते विलगीकरण कक्षात आहेत. मी या हॉस्पिटलमध्ये दोन गोष्टींसाठी आलो होतो. एक म्हणजे रुग्णांना दुरुन पाहून त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करायची आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का, ते जाणून घ्यायचे होते. त्याचबरोबर रुग्णालयात 80 संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यांनाही काही अडचण आहे का? हे जाणून घ्यायचे होते. इथे ओपीडी चालू आहे. दररोज 300 ते 350 रुग्ण रुग्णालयात येत आहेत. ओपीडी जिथे चालते तिथेही काही अडचण येत आहेत का? त्याचबरोबर रुग्णालयातील लॅबोरेटरीला काही अडचणी आहेत का? ते जाणून घेण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात आलो होतो, असे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता ही 80 बेडची आहे. ती आपण 100 केली आहे. रुग्णांना टीव्ही, वायफाय, पेपर, जेवण, फळं देण्यापर्यंतच्या सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील लॅबची क्षमता ही प्रतिदिन 100 टेस्ट अशी आहे. ही क्षमता आपल्याला दुप्पट करायची आहे. त्यासाठी मशिन उपलब्ध केलं जाईल आणि बुधवारपर्यंत प्रतिदिन 350 टेस्ट अशी क्षमता केली जाणार आहे. एकाच लॅबवर विसंबून चालणार नाही. केईएम हॉस्पिटलमध्येही अशाच स्वरुपाची नवीन मशिन बसवली जाणार आहेत. तिथे दिवसाला 250 टेस्ट होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

याव्यतिरिक्त साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या आत जे.जे., हाफकिन मुंबई, बीजे पुणे याठिकाणी देखील नवीन लॅब सुरु करणार आहोत. त्यासंदर्भातील सर्व आदेश दिले जाणार आहेत. जिथे मेडीकल कॉलेजची हॉस्पिटल आहेत तिथे लॅब उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद या चारही ठिकाणी लॅब उभारण्याचे निर्णय झाले आहेत. महिन्याभराच्या आत हे सर्व लॅब सुरु होतील, असंदेखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -