Coronavirus – शेवटी लोकांना समजवण्यासाठी महापौरांना उतरावं लागलं रस्त्यावर!

नागरिकांनी घरात बसून राहावे गर्दी करू नये असे आवाहन महापौरांनी यावेळी नागरिकांना केले.

करोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरीता लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र या आदेशालाही न जुमानता नागरिक वस्तू खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी करीत आहेत त्यामुळे त्यांना समजवण्यासाठी केडीएमसीच्या महापौर विनिता राणे या आज रस्त्यावर उतरल्या त्यांनी लोकांना घरी थांबवण्याचे आवाहन केले.

करोनचा धोका ओळखून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला घरी बसण्याचे तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बाजारपेठा बंद करण्याचे आदेश  दिले आहेत मात्र सकाळी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. किराणा मालाच्या दुकानात दुध डेअरीमध्ये नागरिकांची गर्दी आढळून आली. तसेच काही ठिकाणी भाजी विक्री केली जात होती मात्र त्याठिकाणीही नागरिकांनी गर्दी केली हेाती सुरक्षित अंतर ठेवून वस्तू खरेदी कराव्यात असेही आवाहन करण्यात आले आहेत मात्र सरकारच्या कोणत्याही आदेशाला न जुमानता नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना आढळून आले पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडले की काय म्हणून नागरिक घराबाहेर पडत होते. शेवटी महापौर राणे यांनी घराबाहेर येत नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले.

त्याचबरोबर महापौरांनी  कल्याण आणि डोंबिवलीतील काही भागात जावून पाहणी केली. त्यावेळी भाजी विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी भाजी विक्रेत्यांची फिरती गाडी ठेवता येईल का यासंदर्भातही महापौरांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी महापौरांसोबत  ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे उपस्थित हेाते. नागरिकांनी घरात बसून राहावे गर्दी करू नये असे आवाहन महापौरांनी यावेळी नागरिकांना केले.


हे ही वाचा – CoronaVirus : शाहीनबागेतल्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी हटवलं!