घरमुंबईजोगेश्वरीतून अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन विनयभंग

जोगेश्वरीतून अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन विनयभंग

Subscribe

जोगेश्वरीतून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपहरणासह विनयभंग आणि पोस्कोच्या गुन्ह्यांची नोंद करुन आरोपी तरुणाला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

17 वर्षांची ही तरुणी जोगेश्वरी परिसरात राहते. सध्या ती त्याच परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी 21 जानेवारीला सायंकाळी ती महाविद्यालयात जात होती. यावेळी तिचा आरोपी परिचित मित्र तिथे आला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. यावेळी तिने मिरचीची पावडर त्याच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पावडकर तिच्याच अंगावर आणि डोक्यावर पडल्याने तिला दिसेनासे झाले होते.

- Advertisement -

ही संधी साधून त्याने तिचे रिक्षातून अपहरण करुन आझाद नगर मेट्रोजवळ आणले. यावेळी त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरड करुन स्वत:ची सुटका करुन घरी तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी रात्री उशिरा ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरण, विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. प्राथमिक तपासात तक्रारदार तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -