घरमुंबई‘स्वप्नपूर्ती’संकुलातील अंतर्गत गाळे रद्द करावेत

‘स्वप्नपूर्ती’संकुलातील अंतर्गत गाळे रद्द करावेत

Subscribe

सिडको अध्यक्षांची गृहसंकुलास भेट

खारघर सेक्टर 36 मधील सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृह संकुलातील अंतर्गत गाळे रद्द करण्याबाबत येथील रहिवाशांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मागणी केली होती, त्या विषयावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वप्नपूर्ती गृहसंकुलास भेट देऊन रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

खारघर सेक्टर 36 मधील सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलामध्ये सिडकोने अंतर्गत गाळे आणि प्रवेशद्वाराजवळील ओटे विक्रीस काढले आहेत.याला स्वप्नपूर्ती मधील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. या बाबत येथील नागरिकांनी गेल्या दोन महिन्यांपासून विरोध करत सिडको अधिकार्‍यांना पत्र व्यवहार केला आहे. याबाबत दि 13 जानेवारी 2019 रोजी खारघरमध्ये स्वनपूर्तीमधील रहिवाशांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत एक मिटींग आयोजित केली. या ठिकाणी रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये अंतर्गत गाळे, ओटे आणि सीसीटीव्ही या विषयांवर केली.

- Advertisement -

 या वेळी आमदारांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना घेऊन या ठिकाणी मंगळवारी पाहणी दौरा केला आणि नंतर अधिकारी आणि येथील रहिवाशी यांच्यात एक बैठक घेतली. यावेळी स्वप्नपूर्ती गृह संकुलातील ओटे आणि अंतर्गत गाळे रद्द करण्याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही, तो पर्यंत ही प्रक्रिया थांबवा. असे अधिकार्‍यांना सांगितले. तसेच येत्या आठवड्यात सिडकोचे अधिकारी आणि स्वप्नपूर्तीमधील रहिवाशांचे शिष्टमंडळाची संयुक्त मिटींग घेऊन तोडगा काढला जाईल, असे अश्वासन दिले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सिडकोचे अधीकारी एस. के. कराड, लक्ष्मीकांत डावरे.श्रीकांत पोपणकार आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -