Corona : भाजप नेते किरीट सोमय्या यांची कोरोनावर मात

Kirit Somaiya

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केली असून याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवर माहिती दिली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती दिली. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती १० ऑगस्ट रोजी समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. मी आणि माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत, असे ट्विट त्यांनी केले होते.

काय म्हणाले किरीट सोमय्या 

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे. डॉ. राहुल पंडीत आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारानंतर मी आणि माझी पत्नी मेधा घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

हेही वाचा –

पाळीव कुत्र्याला ठार मारून खा! सनकी किंम जोंगचा फतवा