घरमुंबईदिवाळीपर्यंत महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा इशारा

दिवाळीपर्यंत महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा इशारा

Subscribe

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. रत्नागिरी दापोलीतील त्यांचा रिसॉर्ट दिवाळीपर्यंत पाडण्यात येणार असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. याबाबत किरीट सोमय्या रोज अपडेट्स देत आहेत. आज पुन्हा एक व्हिडीओ जारी करत त्यांनी महाविकास आघाडीलावर टीकास्त्र सोडलं. तसंच, लवकरच महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले रत्नागिरी दापोलीतील ट्वीन रिसॉर्ट दिवाळीपर्यंत पाडणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

हेही वाचा – चलो दापोली रिसॉर्ट तोडो! अनिल परबांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांचा दापोली दौरा

- Advertisement -

रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दापोलीतील ट्वीन रिसॉर्ट पाडण्याचा आराखडा तयार झाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. तसंच, हे रिसॉर्ट पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला सोमय्यांनी दिला होता. त्यानुसार, कोणतं तत्रज्ञान वापरायचं आणि रिसॉर्ट पाडण्यासाठी लवकरच टेंडर निघणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

हेही वाचा – ट्वीन टॉवरचा प्रयोग कोकणातही करा, किरीट सोमय्यांचा सरकारला सल्ला

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अनिल परबांच्या अनधिकृत ट्वीन रिसॉर्टना तोडण्याचा आराखडा जाहीर केला. सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर व पाडण्याचा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणार. मला विश्वास आहे की येत्या दीपावलीपर्यंत महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक जमीनदोस्त झालेले असणार!

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचा सोमय्यांचा दावा आहे. तसेच रिसॉर्ट खरेदी करताना बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. याप्रकरणी सोमय्यांनी दापोली जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली. तसेच साई रिसॉर्ट खरेदीसाठी परब यांनी कुठून पैसै आणला याचा तपास करणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -