घरताज्या घडामोडीनासाच्या आर्टेमिस-1 इंजिनमध्ये बिघाड; लॉन्चिंग लांबणीवर

नासाच्या आर्टेमिस-1 इंजिनमध्ये बिघाड; लॉन्चिंग लांबणीवर

Subscribe

नासाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे आता अनिश्चित काळासाठी याची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत नासाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.

नासाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे आता अनिश्चित काळासाठी याची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत नासाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. इंजिन क्रमांक तीनमध्ये बिघाड झाल्याने याचे प्रेक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Due To Engine Issue Artemis 1 Launch Launch Scrubbed)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हणजेच आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता आर्टेमिस-1 चे प्रेक्षेपण होणार होते. या रॉकेटमधून सुमारे 42 दिवसांच्या मोहिमेवर क्रूशिवाय ओरियन अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची योजना होती. मात्र, प्रेक्षणापूर्वी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये जोरदार गडगडाटी वादळादरम्यान रॉकेटच्या जवळ असलेल्या लॉन्च पॅड आणि 600-फूट टॉवरवर वीज पडली.

- Advertisement -

वीज पडल्यामुळे या रॉकेटच्या 3 नंबर इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे प्रेक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, आर्टेमिस-1 मोहिमेमध्ये नासाच्या नवीन आणि सुपर हेवी रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे.

“Artemis -1 चे लॉन्चिंग आज होणार नाही. इंजिनमध्ये ऑइल लीक होत असून आम्ही त्यावर काम करत आहोत. टीम यासंबंधित डेटा गोळा करत आहे. तसेच पुढील लॉन्चिंग तारखी ही लवकरच जाहीर करणार आहे”, असे नासाने ट्वीट करत म्हटले आहे.

- Advertisement -

हे 322 फुटांचे रॉकेट नासाने बनवलेले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाने बनवलेले हे रॉकेट चंद्रावर जाणार आहे. तसेच हे काही छोटे उपग्रह कक्षेत सोडेल आणि स्वतः कक्षेत स्थापित होईल. Artemis -1 या नवीन अंतराळ प्रक्षेपण प्रणालीचे हे पहिले उड्डाण असेल. नासाने नमूद केल्याप्रमाणे हे एक हेवी लिफ्ट रॉकेट आहे.


हेही वाचा – आपचे नायब राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, आमदार करणार दिल्ली विधानसभेत मुक्काम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -