घरमुंबईयेत्या चार दिवसांत किरीट सोमय्यांचे असे असतील चार दौरे; मोठा फौजफाटा तैनात...

येत्या चार दिवसांत किरीट सोमय्यांचे असे असतील चार दौरे; मोठा फौजफाटा तैनात असताना कोल्हापूरकडे रवाना

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी असल्याची रितसर नोटीस दिली असताना मी कोल्हापूरला जाणाराच या मतावर ते ठाम होते. माझा नियोजित दौरा पूर्ण करणारच असा निश्चय सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या भूमिकेमुळे त्यांना थांबवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर पोलीस तसेच सरकारला आक्षेप घेण्याचे नेमके कारण काय आहे ? येत्या ४ दिवसात सोमय्या मोठे चार दौरे करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दौऱ्यात नेमके काय भूमिका त्यांची असणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केला आणि एकच खळबळ उडाली. या संदर्भातच या गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी सोमय्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्या ते कोल्हापूरला दाखल होणार आहेत. मात्र त्यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

असा असेल सोमय्यांचा चार दिवस दौरा

किरीट सोमय्या चार दिवसांसाठी दौऱ्यावर आहेत. दौऱ्या दरम्यान देणाऱ्या सर्व ठिकाणांवर आर्थिक गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

  • मिळालेल्या माहितीनुसार, उद्या कोल्हापुरात जाऊन सोमय्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • यानंतर २३ सप्टेंबर रोजी ते पारनेरमधील आणखी एका साखर कारखान्याला भेट देणार आहेत. तसेच या कारखान्याचीही सर्व माहिती ते जाणून घेतील.
  • २७ सप्टेंबर रोजी अलीबाग येथे जाऊन रश्मी ठाकरे यांच्या अलीबाग येथील बंगल्याची पाहणी करणार आहेत.
  • ३० सप्टेंबर रोजी सोमय्या उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देतील.

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात चाललेय तरी काय?; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -