घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात कोयते पुरवणारा पोलिसांच्या जाळ्यात; १०५ कोयते जप्त

पुण्यात कोयते पुरवणारा पोलिसांच्या जाळ्यात; १०५ कोयते जप्त

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे पोलिसांनी कारवाई करत यातील आरोपींवर कारवाई करण्याचे काम सुरु केले आहे. हा मुद्दा नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

पुणेः पुण्यात कोयता गॅंगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १०५ कोयते पोलिसांंनी जप्त केले आहेत.

पुणे पोलिसांच्या युनिट १ शाखेने ही कारवाई केली आहे. हुसेन राजगारा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो अन्य आरोपींना कोयते पुरवत होता. रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये त्याचे दुकान आहे. मध्य प्रदेशमधून तो कोयते आणायचा, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहे. कोणाच्या सांगण्यावरून आरोपींना कोयते पुरवले जात होते. त्याचे पैसे कशाप्रकारे दिले जात होते. हे पैसे कोण देत होते. त्याचा अन्य कोणी साथीदार आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे पोलिसांनी यातील आरोपींवर कारवाई सुरु केली आहे. हा मुद्दा नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, बारामतीमध्ये तसेच मांजरी या डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदार संघात, हडपसर आमदार चेतन तुपे यांच्या मतदार संघात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. या गँगकडून काचा फोडून, दहशत निर्माण केली जात आहे. महिलांना वेगळ्या पद्धतीने धमकावले जात आहे. हे गुंड हॉटेलमध्ये खाऊन पिऊन मजा करतात. पण त्याची बिले देत नाहीत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडत आहेत, असे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले होते.

- Advertisement -

कोयत्याने दहशत करणाऱ्या काही मुलांना अटक झाली आहे. यातील सर्वाधिक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ही मुले सोशल मीडियावर नाही तर चित्रपट बघून व दारू पिऊन अशाप्रकारे गोंधळ घालतात, अशी माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली होती. सरकारने कोयता गँगची दहशत रोखण्यासाठी आवश्यकती पावले उचलवावी, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली होती.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -