घरमुंबईभिवंडी पालिकेकडून रस्त्यावर कुर्बानी सेंटर

भिवंडी पालिकेकडून रस्त्यावर कुर्बानी सेंटर

Subscribe

हायकोर्टाच्या निर्णयाला हरताळ

बकरी ईद सण येत्या सोमवारी 12 ते 14 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या बकरी ईद सणाला दरवर्षी स्लाटर हाऊस व्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कुर्बानी देण्यासाठी तात्पुरत्या कुर्बानी सेंटरची उभारणी भिवंडी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ऐन बकरी ईदच्या तोंडावरच रस्त्यावर कुर्बानी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या मार्केट विभाग उपायुक्त वंदना गुळवे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

असे असताना पालिकेच्या उपायुक्तांनी गुरुवारी शहरातील विविध भागातील सार्वजनिक रस्त्यांवर 38 ठिकाणी कुर्बानी सेंटर प्रभाग निहाय जाहीर केले आहेत. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप करत भाजपा, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोज रायचा,अशोक जैन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशन व मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

या कुर्बानी सेंटरच्या वादामुळे महापालिकेच्या अधिकारी वर्गात भिती पसरली असून यातून महापालिका प्रशासन कसा मार्ग काढते, याकडे हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. याबाबत संबंधित हिंदुत्ववादी संघटनांनी पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब आणि पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना निवेदन देऊन न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून भिवंडी शहरात दिलेल्या तात्पुरत्या 38 कुर्बानी सेंटरच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

बकरी ईद निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुमारे 85 लाखांहून अधिक खर्चाची पालिकेकडून तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या मार्केट विभाग , वाहन विभाग ,आरोग्य विभाग ,पाणी पुरवठा विभाग तसेच विद्युत विभागामार्फत हा खर्च करण्यात येणार आहे. हा सण तीन दिवस साजरा होणार असल्याने सुमारे 430 कर्मचारी आणि अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब, मार्केट विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे व महापौर जावेद दळवी यांनी या संदर्भात आरोग्य विभागाचे प्रमुख व प्रभाग अधिकारी,कर्मचार्‍यांची एक विशेष बैठक नुकतीच घेतली.

- Advertisement -

त्यानंतर तयारी सुरू केली आहे. प्रभाग समिती 1 ते 5 अंतर्गत असलेल्या बाला कंपाऊंड, खंडुपाडा,रहेमतपुरा,गैबीनगर, मिल्लतनगर, फंटोळेनगर, पिराणीपाडा, पटेलनगर,अजमेरनगर, शास्त्रीनगर, इदगाहरोड, दर्गारोड, आजमीनगर, समदनगर , म्हाडा कॉलनी अशा नागरीवस्त्या, सोसायटी असलेल्या विविध ठिकाणी कुर्बानी सेंटर पालिका प्रशासनाच्यावतीने उभारण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -