घरमुंबईमुलुंडमध्ये बिबटयाचा हल्ला

मुलुंडमध्ये बिबटयाचा हल्ला

Subscribe

सूरजच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याला केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखळ करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये भरवस्तीत बिबट्या शिरल्याच्या अनेक घटना घटना घडल्या आहेत. त्यामुळे बोरीवली, ठाणे, मुलुंड या परीसरातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊनच रात्री वावरावे लागते. शनिवारी मध्यरात्री बिबटा मुलुंडमधील राहुल नगर बिबट्या दिसला. या बिबट्याने एकावर हल्ला चढवत त्याला जखमी केले आहे. सूरज गवई असे या जखमी तरुणाचे नाव असून सध्या जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

…आणि बिबट्याने हल्ला केला

शनिवारी २ च्या सुमारास सुरज घराजवळ बाहेर बांधलेला कुत्रा भुंकत होता. ते पाहण्यासाठी सूरज आणि त्याचे वडील घराबाहेर पडले. यापरीसरात बिबट्या दबा धरुन बसला होता. त्याने या दोघांवर हल्ला केला. यात सूरजच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याला केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखळ करण्यात आले आहे.

सूरजच्या उजव्या डोळ्याला आणि डोक्याला मार लागला होता. पण त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला लवकरच डिस्चार्ज दिला जाईल.
-डॉ. अविनाश सुपे ,केईएम रुग्णालय, अधिष्ठाता
- Advertisement -

 

या आधीही दिसला बिबट्या

मुलुंडमध्ये जानेवारी महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ६ जण जखमी झाले होते. मुलुंडच्या नानेपाडा परिसरात हा हल्ला झाला होता. बोरीवली आणि ठाण्यातही अशा घटना घडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -