घरमुंबईठाण्यातील बिबट्याला ६ तासानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश

ठाण्यातील बिबट्याला ६ तासानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Subscribe

कोरम मॉलचे सी. सी. टीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंती वरून पहाटे ५.३० च्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाण्याच्या सत्कार हॉटेलमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. ६ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेशुध्द करुन बिबट्याला जेरबंद केले आहे. ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये मध्यरात्री बिबट्या शिरला होता. पहाटे ५.३० च्या सुमारास बिबट्या मॉलच्या पार्किंमधून बाहेर पडला असल्याची माहिती मॉल प्रशासनाने दिली आहे. पार्किंमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग, पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मॉल आणि आसपासच्या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना बिबट्या मॉलच्या शेजारी असलेल्या सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये शिरला असल्याचे समोर आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर बिबट्याला बेशुध्द करुन जेरबंद करण्यात आले.

मध्यरात्रीच्या सुमारास कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या शिरला होता. कोरम मॉलचे सी. सी. टीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंती वरून पहाटे ५.३० च्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागामार्फत संपूर्ण मॉलची आणि परिसराची पहाणी करण्याचे काम सुरु केला. दरम्यान, वनविभागाला मॉलच्या शेजारी असलेल्या सत्कार हॉटेलमध्ये बिबट्या दिसला. हॉटेलच्या बेसमेंटच्या एका रुममध्ये बिबट्या असल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला जेरबंद केले. दरम्यान, हा बिबट्या आल्यामुळे ठाणेकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते

- Advertisement -

ठाण्याच्या नितीन कंपनीजवळ हा कोरम मॉल आहे. कोरम मॉलच्या आसपास गजबलेली लोकवस्ती आहे. मॉलच्या काही अंतरावरच येऊरचे जंगल आहे. त्यामुळे त्याबाजूनेच बिबट्या आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, कोरम मॉलचा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने या ठिकाणी बिबट्या फार काळ थांबू शकणार नाही, असा अंदाज वन विभागाने वर्तवला होता. मात्र बिबट्या त्याच परिसरातील सत्कार हॉटेलमध्ये शिरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -