घरमुंबईएमयुटीपी-३चा लेटमार्क,४७ एसी लोकल रखडल्या

एमयुटीपी-३चा लेटमार्क,४७ एसी लोकल रखडल्या

Subscribe

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि विकासासाठी रेल्वेने डिसेंबर २०१६मध्ये एमयुटीपी-३ प्रकल्पाची घोषणा केली होती. यावेळी एमआरव्हीसीच्या सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर यंदा अर्थ संकल्पात एमयुटीपी-३ साठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये ४७ एसी लोकलचाही समावेश आहे. या लोकलची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात केली जाणार आहे. बांधणीनंतर प्रथम एसी लोकल पनवेल ते कर्जत आणि विरार ते डहाणू या नव्या प्रकल्पांवर चालवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. दरम्यान एसी लोकलकडे प्रवाशांकडून पाठ फिरवल्याने प्रशासनातील अधिकार्‍यांमध्येही धाकधूक वाढली आहे.

बहुप्रतिक्षीत पनवेल ते कर्जत दुहेरी उपनगरीय मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्प झाल्यानंतर या मार्गावर प्रथम वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन होते. मात्र दोन्ही प्रकल्पांच्या कामांकरिता एमआरव्हीसीला दोन वेळा निविदा काढाव्या लागल्या. परिणामी या 47 एसी लोकलच्या प्रकल्पादेखील लेटमार्क लागला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च आणि एसी लोकलचा प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्पाला दुहेरी फटका बसणार आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल 25 डिसेंबर 2017 पासून सुरु झाली. मात्र या लोेकलला प्रवाशांनी प्रतिसाद दिलेला नाही. सध्याच्या घडीला 5 एसी लोकल दाखल झालेल्या आहेत. परंतु त्यापैकी एकाच एसी लोकलच्या फेर्‍या सुरु आहेत. तर मध्य रेल्वेवर ठाणे ते पनवेल दरम्यान जानेवारी महिन्यापासून पहिली एसी लोकल सुरु करण्यात आलेली आहे. या लोकलला देखील प्रवाशांनी पसंती दिलेली नाही. त्यामुळे सेमी लोकलचा पर्याय तपासून पाहिला जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर भेल कंपनीच्या एकूण 29 एसी लोकल येणार आहेत. त्यापैकी 12 लोकलचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु सध्या धावत असलेल्या एसी लोकलकडे प्रवासी पाठ फिरवित असल्याने रेल्वे प्रशासनामध्ये या नव्या एसी लोकल चालविण्या संदर्भात संभ्रम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -