घरताज्या घडामोडीगुजरातच्या गिफ्ट सिटीप्रमाणे मुंबईच्या 'बीकेसी'चाही विकास करा ; राहुल शेवाळे यांची मागणी

गुजरातच्या गिफ्ट सिटीप्रमाणे मुंबईच्या ‘बीकेसी’चाही विकास करा ; राहुल शेवाळे यांची मागणी

Subscribe

गुजरातमधील गिफ्ट (GIFT) सिटीप्रमाणे मुंबईतील वांद्रे - कुर्ला संकुलाचा विकास करावा आणि तशाच करसवलती आणि इतर सुविधा इथेही लागू कराव्यात, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. केंद्रीय अर्थसंल्पावरील चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी अर्थमंत्र्यांकडे ही मागणी केली.

गुजरातमधील गिफ्ट (GIFT) सिटीप्रमाणे मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलाचा विकास करावा आणि तशाच करसवलती आणि इतर सुविधा इथेही लागू कराव्यात, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. केंद्रीय अर्थसंल्पावरील चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी अर्थमंत्र्यांकडे ही मागणी केली. तसेच मुंबईत त्वरित इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय आय एम) ची स्थापना करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी आपले मत मांडले. खासदार शेवाळे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तरीही अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीच ठोस तरतूद नाही. सर्वात जास्त कर देणाऱ्या मुंबईकरांची निराशा अर्थसंकल्पातून झाली आहे.

- Advertisement -

आंतररष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आय एफ इस सी) मुंबईत प्रस्तावित होते. मात्र, बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित स्थानकाच्या कामामुळे हे सेवा केंद्र उभारण्यात उशीर झाला. मात्र, त्यामुळे हे केंद्र गुजरातला उभारण्यात आले. मात्र, आय एफ एस सी सेंटर हे मुंबईतच व्हायला हवे. तसेच गुजरातच्या गिफ्ट सिटी मध्ये कर सवलती आणि ज्या इतर सुविधा उद्योगधंद्याना दिल्या जातात, त्याच सवलती मुंबईच्या बीकेसी मध्ये दिल्या जाव्यात आणि गिफ्ट सिटी च्या पार्श्वभूमीवर इथेही अशीच सिटी उभारली जावी.


हे ही वाचा – Lakhimpur Kheri Case: केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -