घरताज्या घडामोडीपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेत दिवसा दारुच्या पार्ट्या!

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेत दिवसा दारुच्या पार्ट्या!

Subscribe

मुंबई महापालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट समोरील आणि मनीष मार्केटच्या शेजारील छत्रपती शिवाजी महाराज मंडई धोकादायक ठरल्याने पाडण्यात आली आहे. मात्र आता याठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या जागेत भरदिवसा मद्यपी, गर्दुल्ले यांच्याकडून दारुच्या पार्ट्या सुरू असून पालिकेची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर उडत गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या मालकीची छत्रपती शिवाजी मंडई आहे. ह्या मंडईचे बांधकाम धोकादायक ठरल्याने पालिकेने सदर बांधकाम काही दिवसांपूर्वीच जमीनदोस्त केले. या मंडईतील मच्छीविक्रेते यांचा विरोध असतानाही त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आता त्यांना व्यवसायासाठी तात्पुरती शेड उभारण्यात येत आहे. या मच्छी विक्रेत्यांना क्रॉफर्ड मार्केट येथे कायमस्वरूपी बसविण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र आता ज्या जागेवर मच्छीमार्केट होते त्या जागेवर लवकरच कार्यालयीन कामासाठी पालिकेकडून नव्याने इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या या जागेवर तात्पुरत्या शेड उभारण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

सदर जागा ही मोकळी आहे. या शेडमध्ये आजूबाजूच्या परिसरातील मद्यपी, गर्दुल्ले भरदिवसा दारुच्या पार्ट्या झोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. लोखंडी चॅनल आणि लोखंडी पत्र्याच्या ओपन शेडमध्ये भरदिवसा अगदी दुपारचे अडीच-तीन वाजताच्या सुमारास दारुच्या आणि पाण्याच्या बाटल्या, चकना घेऊन काही लोक पार्टी करताना आढळून आले. तर आणखीन एक व्यक्ती एकटाच दारू पार्टी करताना आढळून आला. या मंडईच्या गेटच्या आवारात बाजूलाच दारुच्या बाटल्या पडल्याचे आणि बाजूलाच जेसीबीच्या लोखंडी हात पंज्यातही दारू व पाण्याच्या बाटल्या दिसून आल्या आहेत.
तसेच, या मंडईच्या जागेत बाहेरील व्यक्ती, बाजूच्या मार्केटमधील लोक त्यांच्या दुचाकी वाहनांची पार्किंग करीत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे पालिकेच्या मंडईची मोकळी जागा ही दारुच्या पार्ट्या आणि अनधिकृत पार्किंगसाठी वापरली जात असून पालिका प्रशासन सुस्त असल्याचे दिसते. ह्या जागेत अशाच दारूच्या पार्ट्या सुरू राहिल्यास ही जागा म्हणजे दारुड्यांचा बसण्याचा व फुकटात पार्ट्या करण्याचा अड्डाच बनत जाणार आहे. या सर्व घटनाप्रकाराला आळा न घातल्यास दारूच्या पार्टीत भांडणे, हाणामाऱ्या होऊन एखाद्याचा मुडदा पडल्यानंतर पालिकेला जाग येणार आहे का? असा सवाल निर्माण होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ulhasnagar slab collapses : उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, १ जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -