घरCORONA UPDATECoronaEffect: तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याचा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढेल

CoronaEffect: तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याचा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढेल

Subscribe

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलनंतर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवून तो ३ मेपर्यंतचा केला आहे. मात्र मुंबई, पुण्यासारख्या शहरांची कोरोनासंबंधीची सद्यपरिस्थिती पाहता हा लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय ठाणे आणि नवी मुंबई यांनाही लॉकडाऊनचा कालावधी वाढवून दिला जाईल, असे सांगितले जात आहे. राज्य सरकारने मुंबई, पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तर राज्यात मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत या शहरांचा लॉकडाऊन कालावधी वाढवला जाईल यात शंका नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तसेच येथील नियमही काहीसे कडक करण्यात येतील. शिवाय लोकल गाड्या, बसेस, दुकानं आणि इतर गोष्टींवरील निर्बंधही कायम ठेवले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – देशभरात आजपासून दुकाने उघडणार; मॉल्स, मद्य विक्रिची दुकाने मात्र बंदच राहणार

- Advertisement -

आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं 

मुंबई, पुण्यासारखी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं राज्याला बंद ठेवणे तसे परवडणारे नाही. सर्वाधिक उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार ही या दोन प्रमुख शहरांमध्ये होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून पुण्यातही मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, कंपनीज, आयटी हब, कारखाने आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे जास्त काळ लॉकडाऊन असल्याचा फटका राज्य सरकारच्या तिजोरीवर नक्कीच परिणाम करणारा ठरणार आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा हा ४ हजार ५८९ वर गेला आहे. तर दिवसाला साधारण २०० नव्या रुग्णांची भर त्यामध्ये पडत आहे. तसेच पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी १०४ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. पुणे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचे निर्बंध आधीच कडक करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक झोनमध्ये त्यांनी कर्फ्यू लागू गेला असून लोकांना फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -