घरमुंबईCode OF Conduct : विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; कारण काय?

Code OF Conduct : विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; कारण काय?

Subscribe

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आचारसंहितेचा काळ सुरू असताना दालनात बैठका घेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीची दखल आचारसंहिता भंग समितीने घेतली असून त्याबाबत विधानसभा अध्यक्ष कार्यालय, मुंबई महानगरपालिका आणि म्हाडाला या तक्रारीबाबत सोमवारपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (lok sabha election 2024 code of conduct violation complaint against assembly speaker rahul narvekar)

राहुल नार्वेकरांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दक्षिण मुंबईतील नागरिकांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही नार्वेकर हे त्यांच्या
विधानभवनातील दालनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना  बोलावून नागरी कामे करण्याचे आदेश देत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : फडणवीसांकडून उमेदवारी, मात्र श्रीकांत शिंदेंची भाजपा कार्यकर्त्यांवर टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा  निवडणूक जाहीर केल्यानंतर देशात  आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र राहुल नार्वेकर यांच्याकडून आचारसंहितेची खुलेआम पायमल्ली केली जात आहे. नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष या सांविधानिक पदाचा गैरवापर करून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध नागरी प्रश्नांबाबत स्वतःच्या दालनात महानगरपालिका आणि  शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून वारंवार बैठका घेत आहेत. या बैठकीत  त्यांना नागरी कामे तातडीने करण्यासंदर्भात आदेश दिले जातात. इतकेच नव्हे तर नार्वेकरांच्या दालनात अधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत जनता दरबार भरवला जात असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले  आहे.

- Advertisement -

तक्रारदारांनी आपल्या अर्जात  राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या बैठकीचे  एक उदाहरणही दिले आहे. नार्वेकर यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या आणि नागरी प्रश्नांसंदर्भात 2 एप्रिल 2024  रोजी विधान भवनातील आपल्या  दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत म्हाडा, महानगरपालिका आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. नार्वेकरांकडून आचारसंहितेचा भंग होत असून  याची खात्री करण्यासाठी विधान भवनाच्या सुरक्षा विभागाची प्रवेशद्वारावरील अभ्यागतांची यादी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत आणि हे पुरावे नष्ट होण्यापूर्वीच जप्त करावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा – Rohit Pawar : हातात खेकडा पकडणं रोहित पवारांना पडलं महागात; PETA कडून कारवाईची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -