घरमुंबईLok Sabha : मित्र पक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळतायत का? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मंत्र्यांकडून...

Lok Sabha : मित्र पक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळतायत का? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मंत्र्यांकडून खदखद व्यक्त

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र महायुतीकडून अद्यापही काही जागांवर तडजोड असल्याचे पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांनी युतीधर्मावर आपल्या नाराजीला वाचा फोडली. मात्र एकनाथ शिंदे यांनी तडजोडी कराव्या लागतात, पण खासदारांवर अन्याय होणार नाही, असा शब्द दिल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024 Do allies follow alliance honestly? In the meeting with the Chief Minister the Minister expressed his displeasure)

शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी बैठकीत आपल्या नाराजीला वाचा फोडली. त्यांनी म्हटले की, धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळं मिळाली, मात्र आता आपलं महत्त्व कमी होताना दिसत आहे. परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला. पण आपले मित्र पक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत का? रायगड, शिरूर हे मतदारसंघ आपल्या हक्काचे असतानाही मित्र पक्षाला दिले आणि अपमान गिळून त्यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आता ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि पालघर मित्रपक्षांना सोडू नका, अशी विनंती आमदारांनी केल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : संजय राऊत सांगलीत असतानाच काँग्रेस नेता म्हणतो, उमेदवारीबाबत चांगली बातमी येईल

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेतली. कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत आणि इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली. यावेळी इतर पक्ष आपल्या जागेवर दावा अशी आग्रही भूमिका मंत्र्यांनी मांडली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, काही अडचणी येत असतील तर त्यासाठी एक वेगळी विंग तयार केली आहे. त्यामाध्यमातून तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. परंतु ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची आहे आणि ती आपल्याला जिंकायची आहे, असा संदेश एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय शिरसाट?

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, सगळीकडे थोड्या कुरघोरी असतात, पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काहीतरी द्यावं लागतं. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळा. आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. कोणी किती जागा लढवल्या याने काही फरक पडत नाही. भाजपा हा मोठा भाऊ आहे, त्यामुळे त्यांनी एक दोन जागा जास्त लढवल्या तर काही फरक पडत नाही. पण ज्यांना आपण तिकिट दिलं गेलं नाही त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केलं जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा – Rohit Pawar : हातात खेकडा पकडणं रोहित पवारांना पडलं महागात; PETA कडून कारवाईची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -