घरमुंबईLok Sabha Election 2024 : वर्षा गायकवाड यांना अखेर उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election 2024 : वर्षा गायकवाड यांना अखेर उमेदवारी जाहीर

Subscribe

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आले होते. मात्र सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका जागेवरून काँग्रेसमधील जुने नेते नाराज झाले होते. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आपली नाराजी व्यक्त करत दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठीची भेट घेतली होती. अशातच आता वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 Varsha Gaikwads candidacy finally announced)

वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या. पण मविआच्या जागावाटपावेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय मुंबईतील जागावाटप करताना विश्वासात घेतले नाही, त्यामुळेही वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र वर्षा गायकवाड यावर आपले मत मांडले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींच्या राज्यात महिलांची मंगळसूत्रे गहाण पडली; संजय राऊत यांची टीका

- Advertisement -

मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन जागावाटप होणं गरजेचं होतं. मुंबईमध्ये मागील काळात आम्ही लोकसभेच्या पाच जागा लढत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जागा लढत होती. त्यामुळे आम्हाला बरोबरीची भूमिका मिळावी, अशी आमची इच्छा होती. तसेच सध्या जागावाटवार आपण नाराज नाही, पण जिथे पक्षाची ताकत आहे, ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत वर्षा गायकवाड यांनी मांडले होते.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर…; विनायक राऊत यांनी सुनावले

वर्षा गायकवाड यांचे दबावतंत्र यशस्वी? (Varsha Gaikwad’s pressure technique successful?)

याशिवाय दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या होत्या. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या 29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला केंद्रीय निवडणूक समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी मागील काही दिवसांपासून उमेदवारीसाठी केलेल्या दबावतंत्राचा अवलंब आता झाल्याचे चित्र आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -