घरमुंबईप्रचाराचा नवा फंडा ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’

प्रचाराचा नवा फंडा ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’

Subscribe

कितीही फिरा पण संपता न संपणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. अगदी माहुल गावापासून ते अणुशक्तीनगर, मानखुर्दपासून ते दादर माहीमपर्यंत पसरलेला महाकाय असा हा मतदारसंघ. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळा मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही ना काही क्लुप्त्या लढवून प्रचार करण्यावर सर्वच राजकीय पक्षांचा भर आहे. तंत्रज्ञान वापरून एखाद्या माणसाचे क्लोन तयार करावेत, तसेच विनियल बोर्ड वापरून तयार केलेले उमेदवारांचे हुबेहुब पुतळे यंदाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आले आहेत.

सुमारे 4,355 चौरस मीटर पसरलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनीही आपल्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. गल्लीबोळात कार्यकर्ते हे प्रचारासाठी पोहचत असले तरीही प्रत्येक ठिकाणी उमेदवाराला पोहचण्यासाठी मर्यादा आहेत. हीच अडचण लक्षात घेऊन आता हुबेहून उमेदवाराच्या आकाराचे चालते बोलते विनियल बोर्डचे पुतळे हे ठिकठिकाणी प्रचारासाठी पोहचत आहेत.

- Advertisement -

मतदारसंघातील नागरिकांना हुबेहुब उमेदवारच वाटावा असे हे पुतळे आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नाना शक्कलपैकी ही एक स्वस्त आणि आकर्षक शक्कल एकनाथ गायकवाड यांनी काढली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा हे स्वस्त असे प्रचारतंत्र यंदाच्या निवडणुकीत मतदारापर्यंत पोहचण्यासाठी वापरण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -