घरमुंबईअंधेरी येथे शिक्षिकेच्या घरी चोरीप्रकरणी प्रेमी युगलांना अटक

अंधेरी येथे शिक्षिकेच्या घरी चोरीप्रकरणी प्रेमी युगलांना अटक

Subscribe

अंधेरी येथे एका शिक्षिकेच्या घरी झालेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या सोन्याचे दागिन्यांची चोरी एका प्रेमी युगलांना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले आहे. पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मौजमजेसाठी या तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 30 वर्षांच्या मुग्धा नितेश कदम या शिक्षिका असून त्या अंधेरीतील भरडावाडी, शिवकृपा निवासमध्ये राहतात.

जानेवारी महिन्यांतील 19 ते 26 तारखेला त्यांच्या घरातून काही अज्ञात व्यक्तीने सुमारे चार लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, हार, ब्रेसलेट, कानातील वेल, चैन लॉकेटसह, अंगठ्या आणि कानातील जोड असा ऐवज चोरी केला होता. 132 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे 26 जानेवारी त्यांच्या निदर्शनास आले होते. या घटनेनंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मुग्धा कदम यांच्या घरी बाहेरील कोणीही व्यक्ती आली नव्हती, त्यामुळे ही चोरी परिचित व्यक्तीनेच केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. हाच धागा पकडून तांत्रिक माहितीवरुन एसीपी भूषण राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या पथकातील एपीआय विकास पाटील, पोलीस हवालदार सादिक मुजावर, सचिन बोंगाणे, पोलीस नाईक शरद पाटील, रतन पाटील, हेमंत पाटील, आश्विन कदम यांनी 18 वर्षांच्या एका तरुणीला ताब्यात घेतले.

- Advertisement -

ही तरुणी याच परिसरात राहत असून मुग्धा कदम यांच्या घरी तिचे नेहमीच येणेजाणे होते. तिनेच तिचा प्रियकर रोहित दिपक चव्हाण याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले दागिने तिने रोहितकडे दिल्याचे सांगितले. त्यानंतर आंबोली, केवणीपाडा, मलिका टॉवरमध्ये राहणार्‍या रोहित चव्हाण याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले. तपासात ते दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तिथेच त्यांचे प्रेमसंंबंध आले होते. या तरुणीला मुग्धा कदम यांच्याकडे लाखो रुपयांचे दागिने असल्याची माहिती होती.

तिने त्यांच्याकडे चोरीची योजना बनविली आणि या कटात रोहितला सामिल करुन घेतले होते. चोरीचे दागिने ते दोघेही विकून त्यातून मिळणार्‍या पैशांतून मौजमजा करणार होते, मात्र या दोघांच्या अटकेने त्यांची ही योजना फसली गेल्याचे एपीआय विकास पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपताच त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -