घरताज्या घडामोडीMaharashtra Budget 2021 : मुंबईला महाविकास आघाडी सरकारचा 'मेगा' बुस्टर

Maharashtra Budget 2021 : मुंबईला महाविकास आघाडी सरकारचा ‘मेगा’ बुस्टर

Subscribe

मुंबईला अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळाले ?

सन 2020-21 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 8 टक्के घट झाली आहे.तरीही अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला. विरोधकांकडून अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याचा आहे की मुंबई महापालिकेचा असा सवालही करण्यात आला आहे. मुंबईतले पायाभूत सुविधा प्रकल्प असोत, पर्यटन प्रकल्प किंवा दळणवळणाच्या सुविधा असोत राज्याच्या तुलनेत मुंबईला यंदाच्या अर्थसंकल्पात यंदा थोड जास्तच झुकत असे माप मिळाल्याचे दिसते. त्यामध्ये मुंबईतले मेट्रो प्रकल्प, महत्वकांशी असा कोस्टल रोडचा प्रकल्प, मुंबईतील दळणवळणाच्या सुविधा अशा प्रकारच्या अनेक प्रकल्पांसाठी बुस्टर देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात झाली आहे. (Maharashtra Budget 2021 give booster for infrastructure projects in Mumbai)

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग

मुंबई-पुणेद्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांच्या, तसेच दोनकिलोमीटर लांबीच्या दोन पुलांचा समावेश असलेल्या 6 हजार 695 कोटी रूपये किंमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून ते डिसेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- Advertisement -

कोस्टल रोड

सागरी महामार्ग-मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हयातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्हयातील रेड्डी अशा 540 किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाच्या कामासाठी9 हजार 573 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ईस्टर्न फ्री वे साठी विलासरावांचे नाव 

दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्यापूर्व मुक्त मार्गाचे नामकरण “विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग” करण्याचा निर्णय मी येथे जाहीर करत आहे.

- Advertisement -

नेहरू सेंटरसाठी निधी
नेहरू सेंटर, मुंबई या संस्थेस अत्याधुनिक यंत्रांची खरेदी, आधुनिकीकरण व नूतनीकरणासाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई मेट्रो प्रकल्पांना बुस्टर

मुंबई शहरातील वाहतूक सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात, असे आपले ध्येय आहे. त्यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी – न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे.वांद्रे – वरळी सागरी मार्ग शिवडी – न्हावा शेवा मार्गाला जोडण्यासाठीवरळी ते शिवडी या चार पदरी उड्डाणपूलाचे काम सुरु झाले असून ते 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मल्टीमोडल कॉरिडॉर

विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या शहरांच्या विकासाकरीता तसेच जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी- न्हावा शेवा मार्गाला जोडणाऱ्या, 40 हजार कोटी रूपये किंमतीच्या, 126 कि.मी. लांबीच्या,विरार ते अलिबाग “मल्टीमोडल कॉरिडॉर” च्या भूसंपादनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरु आहे.
मुंब्रा बायपास जंक्शन,शिळ कल्याण फाटा, शिळफाटा व कल्याणफाटा जंक्शनवर उड्डाणपुलांची निर्मिती,महामार्गाचे रूंदीकरण तसेच कल्याणफाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे.
मुंबई , ठाणे व नवी मुंबई या शहरांभोवती उपलब्ध असलेल्या जलमार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाने ठरविले असून त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यासाठी कोलशेत, काल्हेर, डोंबिवली आणि मीरा भाईंदर या चार ठिकाणी जेट्टी उभारण्यात येत आहेत.

मुंबई अंतर्गत प्रवासासाठी दळणवळण सुविधा –

वांद्रे – वर्सोवा सी लिंक

वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरु झाले आहे, हे आपल्याला माहित असेल. या प्रकल्पाची लांबी 17.17 किलोमीटर असून प्रकल्पाची अंदाजित किंमत 11 हजार 333 कोटी रूपये आहे. वांद्रे-वर्सोवा- विरार या सागरी सेतू प्रकल्पाची अंदाजित किंमत 42 हजार कोटी रूपये असून कामाचा पूर्व सुसाध्यता अहवाल तयारकरण्यात आला आहे.सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

मेट्रो मार्ग

मुंबईतील 14 मेट्रो लाईन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून त्‍याकरीता 1 लाख 40 हजार 814 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सर्व 14 मेट्रो लाइन्सची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर आहेत.मेट्रोमार्ग 2 अ , मेट्रोमार्ग 7 या मार्गांवरील कामे 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येतील.

गोरेगाव – मुलुंड लिंकरोडप्रकल्पाची अंदाजित किंमत 6हजार 600 कोटी रुपये असूनकामाची निविदाविषयक कार्यवाही सुरू आहे. मुंबई शहरातील रेल्वे रुळावरील 7 उड्डाणपूलांची कामेही हाती घेण्यात येत आहेत.

कोस्टल रोड

मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड ) प्रकल्पाचे कामजलद गतीने सुरु असून हा मार्ग सन2024 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.सध्या या प्रकल्पाच्यादक्षिण मुंबईतील बोगद्याचे कामसुरु आहे.

मुंबईतील पर्यटन आकर्षणे

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ४०० कोटी रूपये
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

बीकेसीचा होणार कायापालट

बीकेसीत होणार पादचारी पूल

वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानादरम्यान,त्यांना जोडणारा पादचारी पूल उभारण्यात येणार असून या प्रकल्पाकरीता 98 कोटी 81 लाख रुपयेखर्च अपेक्षित आहे.

बॅटरी ऑपरेटेड सायकल

वांद्रे कुर्ला संकुलातील सायकल मार्गावरील बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवरमुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींकरिता स्वंतत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबईतील पायाभूत विकास प्रकल्प

बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडूप , वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय झाला असून त्‍याकरीता 19 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मालाड उपनगरातील मनोरी येथेउभारण्याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल डिसेंबर 2021 पूर्वी अपेक्षित आहे.
मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प मार्च2021 पासून सुरु होणार असून त्याकरीता 450 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई परिसरातील दहिसर,पोईसर वओशिवरा नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी 1 हजार 550 कोटी रूपयांची कामे सुरु करण्यात येत आहेत. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगर विकासविभागास 8 हजार 420 कोटी रुपये नियतव्ययप्रस्तावित आहे.

वरळी दुग्धशाळेच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाची निर्मिती करण्याची घोषणा मागील अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली होती. सदर पर्यटन संकुलाच्या विकासाकरीता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -