घरमुंबई'राज्यातील पूरग्रस्त गावे खासदारांनी दत्तक घ्यावीत'

‘राज्यातील पूरग्रस्त गावे खासदारांनी दत्तक घ्यावीत’

Subscribe

महाराष्ट्रातील खासदारांनी 'सांसद आदर्श ग्राम योजने' अंतर्गत पूरग्रस्त गावे दत्तक घ्यावीत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व खासदारांना करावी, अशी मागणी दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील भीषण पुरामुळे शेकडो गावे उध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील खासदारांनी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ही पूरग्रस्त गावे दत्तक घ्यावीत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व खासदारांना करावी, अशी मागणी दक्षिणमध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. याविषयी एक पत्रक खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

काय म्हणाले शेवाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत देशभरातील खासदर प्रत्येकी एक गाव दत्तक घेऊन त्या गावातील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत आलेल्या पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी प्रत्येकी एक पूरग्रस्त गाव दत्तक घेतल्यास त्या गावाचा तातडीने विकास होऊ शकेल‘ ,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात खासदर राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी, ‘सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पूरग्रस्त गावे दत्तक घ्यावीत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.


हेही वाचा – मुंबईच्या डबेवाल्यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -