घरमुंबईबारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या विविध संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन बघता येईल.

निकालाची संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org
http://jagranjosh.com
www.bhaskar.com
http://www.knowyourresult.com
वरील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहेत. निकालासाठी विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीटावरील सीट नंबर आवश्यक आहे. संकेतस्थळांवर प्रत्येक विषयातील गुणांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असेल. याची प्रिंटआउटही विद्यार्थ्यांना काढता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची माहिती एसएमएसव्दारेही प्राप्त होईल.

- Advertisement -

सीबीएसई बोर्डानंतर एचएचसी निकाल
आज सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लागला आहे. दहावी आणि बारावी ही दोन वर्षे मुलांसाठी अतिशय महत्वाची असल्याने सर्वांचेच लक्ष निकालाकडे असते. निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी चिंता आणि उत्सुकता दोन्ही पाहायला मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -