घरमुंबई'या'मुळे बोरीवलीत दोन ठिकाणी मतदान खोळंबा

‘या’मुळे बोरीवलीत दोन ठिकाणी मतदान खोळंबा

Subscribe

मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास आज सकाळीपासून सुरूवात झाली आहे. मात्र, बोरीवली पश्चिममधील दोन मतदान संघात मतदानांमध्ये काही कारणामुळे एकच गोंधळ उडाला होता.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील सोमवार २९ एप्रिलला मतदानास सुरूवात झाली आहे. आज देशात ७१ ठिकाणी तर महाराष्ट्रात १७ ठिकाणी मतदान होत आहे. तसेच ९ राज्यांमध्ये हे मतदान करण्यात येत आहे. मात्र, मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील बोरीवली पश्चिममधील दोन मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान सुरूच झाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच मतदान वेळेवर सुरू झाले नाही, त्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. मतदान करण्याची सुरूवात ही सकाळी ७ वाजल्यापासून होणार होती. मात्र, बोरीवली येथे सकाळपासून रांगेत तिष्ठत उभे रहावे लागल्याने काही मतदार हे मतदान न करताच परत गेल्याचे समोर आले आहे. सकाळी मतदान वेळेवर सुरू झाले नाही म्हणून एकच गोंधळ माजला होता. तसेच डोंबिवलीतही मतदान यंत्रणेत बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया रखडलेली होती.

मतदान न करताच मतदार परतले

बोरीवली पश्चिमेकडील गोराई वन एरिया येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल बुथ क्रमांक ५० वर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. पण सातनंतर ही मतदानास सुरूवात झाली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच मतदारांना मतदान उशीरांने चालू होणार आहे, नेमक का मतदान समस्या निर्माण झाली या संबधी कुठल्याची माहिती मतदारांना देण्यात आली नाही. यामुळे मतदार खूप वेळ रांगेत उभे राहून मतदान केंद्रावर कोणतीच हालचाल न दिसल्यामुळे घरी परतले. तसेच अशीच परिस्थिती त्याठिकाणी अजून एका शाळेमध्ये पाहायला मिळाली. तसेच डोंबिवलीमध्येही ईव्हीइम यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला आहे. तर त्यामुळे तिथल्याही मतदारांमध्ये केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा- Loksabha election Live Update: देशात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -