घरमुंबईमनिषा म्हैसकर यांची पाच महिन्यात दुसर्‍यांदा बदली

मनिषा म्हैसकर यांची पाच महिन्यात दुसर्‍यांदा बदली

Subscribe

बदल्यांचा घोळ सुरूच, तीन अधिकार्‍यांना बदलले

करोना संसर्ग वाढत असतानाच राज्य सरकारकडून प्रशासकिय अधिकार्‍यांच्या बदल्यांचा घोळ अजून सुरुच आहे. शक्रवारी तीन प्रशासकिय अधिकार्‍यांच्या बदल्यांचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला. यात १९९२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसेकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. दरम्यान मनिषा म्हैसकर यांची पाच महिन्यात दुसर्‍यांदा बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारने घेतलेल्या अधिकार्‍यांच्या बदलीचे निर्णय घेतल्यामुळं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारनं राज्यातील तीन प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात हे बदल केले आहेत. १९९२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसेकर-पाटणकर यांची आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे राजशिष्टाचार खात्याच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी होती.

- Advertisement -

तर दुसरीकडे मुंबई महानगपालिकेचे सहाय्यक आयुक्त आशुतोष सलिल यांची पर्यटक विभागाच्या व्यवस्थापकिय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या खांद्यावर आता यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भंडारा ही जबाबदारी देण्यात आली होती. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे २०१६च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -