घरताज्या घडामोडीरेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

Subscribe

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega block on central and harbor railway line)

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला – वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावणार आहेत.

- Advertisement -

मध्य रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन तसेच जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने स्थानकावर पोहोचतील.

- Advertisement -

कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निश्चित स्थानकावर 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत असून पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी-बेलापूर-पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

हेही वाचा – खोकेवाल्या गद्दारांकडून शिवसेना नाव, चिन्ह गोठवण्याचा नीच प्रकार, आदित्य ठाकरेंची विखारी टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -