घरताज्या घडामोडीMega Block News : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Mega Block News : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Subscribe

Mega Block News रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी उपनगरीय भागात मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.

मुंबई : रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी उपनगरीय भागात मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega Block On Sunday At Central And Harbour Railway Line In Mumbai)

मध्य रेल्वे मार्गावर रविवार, 14 एप्रिल रोजी ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन धीमा मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.

- Advertisement -

या ब्लॉकच्या कालावधीत सकाळी 10:43 ते दुपारी 03:44 वाजेपर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी जलद लोकल फेऱ्या मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, सकाळी 10:36 ते दुपारी 03:51 या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद लोकल फेऱ्या कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर पुढे अप धीमी सेवा डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. तसेच मुलुंड येथे वेळापत्रकाच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.

हेही वाचा – Mumbai News : मिठी नदीच्या कामाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना; पालिकेसह एमएमआरडीए रडारवर

- Advertisement -

ठाणे लोकल या डाऊन धीम्या मार्गावर धावतील. सकाळी 11:00 ते संध्याकाळी 05:00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन सेवा वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील/निघतील. डाऊन मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ही टिटवाळा लोकल असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09:53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 03:05 वाजता सुटणार आहे. त्याचप्रमाणे अप मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण ही लोकल कल्याण येथून सकाळी 10:25 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतरची पहिली लोकल परळ लोकल ही ठाणे येथून दुपारी 04:17 वाजता सुटेल.

हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 11:10 ते दुपारी 04:10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सकाळी 10:34 ते दुपारी 03:36 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10:16 ते दुपारी 03:47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला व पनवेल – वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

डाउन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही पनवेल लोकल असेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10:18 वाजता सुटेल. तसेच, ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 03:44 वाजता सुटेल. अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10:05 वाजता पनवेल येथून सुटणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 03:45 वाजता पनवेल येथून सुटणार आहे.


हेही वाचा – Railway News : ऑनलाईन तिकीट कॅन्सलेशनच्या माध्यमातून रेल्वेची 2110 कोटींची कमाई; RTI मधून उघड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -