घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाच्या रुग्णांसाठी हर हर महादेव करीत मिडी बस आली धावून

CoronaVirus: कोरोनाच्या रुग्णांसाठी हर हर महादेव करीत मिडी बस आली धावून

Subscribe

पुण्यातून १५ बसेस मुंबईत दाखल झाल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मुंबईत वाढत जात असल्याने महापालिकेला रुग्णवाहिकेची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील बसेस मुंबईकरांसाठी पुन्हा धावून आली आहे. पुण्यातील भीमाशंकर मंदिरापर्यंत चालविल्या जाणाऱ्या २० मिडी बसेसपैकी १५ बसेस मुंबई महानगर पालिकेला देण्यात आल्या आहेत. या बसेस मधून कोरोनाबाधित रुग्णांची आता वाहतूक करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळख असणारी एसटी बस कोरोना विरोधातील लढ्यात आधीच उतरली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी एसटीच्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून बसेस धावत आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मुंबईत वाढत असल्याने महानगर पालिकाकडे असलेल्या रुग्णवाहिकेची संख्या कमी पडू लागली होती. त्यानंतर बेस्टच्या वातानुकूलित मनी बसगाड्यांचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. तरी सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची वाहतूक करण्यास बसेस कमी पडू नयेत, यासाठी एसटी महामंडळमध्ये असलेल्या पुणे विभागातील मिडी बसेस सुद्धा आता महापालिकेला देण्यात आल्या आहेत. बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २० मिडीबस सेवा सुरू केली होती. मात्र लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्यामुळे या बसेस पुण्यात उभ्याच आहेत. त्यामुळे या २० बसेस पैकी १५ बसेस मुंबई महानगर पालिकेला कोरोनाबाधित रुग्णांची वाहतूक करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. यापूर्वी या बसेस भाविकांची वाहतूक करत होती आता या संकटकाळात रुग्नाचा वाहतूक करणार आहेत.

- Advertisement -

रुग्णवाहिकेवर येणार ताण कमी होणार

एसटी महामंडळाच्या १५ मिडीबसेसवर भीमाशंकर मंदिराचे पोस्टर अगोदरच आहेत. ३२ आसनांच्या या बसेसमध्ये प्रवाशांसाठी दोन दरवाजे आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची वाहतूक सुरक्षित होणार आहे तसेच या मिडीबसेस मध्ये एसटीचे कर्मचारी नसणार आहेत,. पालिका प्रशासन या बसेसवर चालकांची व्यवस्था करणार आहेत. या १५ मिडीबसेसमुळे पालिकांकडे असेल्या रुग्णवाहिकेवर येणारा ताण थोडा फार कमी होणार आहेत. या बसेस कोरोनाच्या संशयित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला या बसगाडीमधून कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे.

बेस्टचा बसेस सुद्धा रुग्णवाहिकेचा रूपात

महापालिका प्रशासनाने बेस्टच्या २० मिनी बसगाड्यांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याची मागणी बेस्टकडे करण्यात आली होती. त्यानुसार काही मिनी बसगाड्यांमधील आसने काढून रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. अशा २० बसगाड्यांमध्ये रुग्णवाहिकेसाठी आवश्यक बदल बस आगारांमध्ये करण्यात येत आहेत. पुढील आठवडाभरात यामध्ये आवश्यक बदल करून मिनी वातानुकूलित बसगाड्यांची रुग्णवाहिका झालेली असेल.

- Advertisement -

भीमाशंकर मंदिराच्या भाविकांसाठी पुणे विभागातून २० मिडीबस सेवा चालविण्यात येत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे या बसेस उभ्या असल्याने या २० मिडी बसेसपैकीं १५ बसेस मुंबई महानगर पालिकेला देण्यात आल्या आहेत. या बसेस मधून कोरोनाबाधित रुग्णांची आता वाहतूक करण्यात येणार आहे. – यामिनी जोशी, विभाग नियत्रंक, एसटी पुणे विभाग


हेही वाचा – LockDown: ९ दिवसांत ९०० किमी मजूरांची चंदिगड ते उत्तरप्रदेश पायीवारी!


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -