घरफिचर्स...नायतर ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट 'बॉबी' नसता!

…नायतर ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ नसता!

Subscribe

सिनेसृष्टीतील कपूर घराण्याचे नावलौकीक जगप्रसिद्ध आहे. दिवंगत आणि ज्येष्ठ अभिनेता पृथ्वीराज कपूर त्यांच्यापासून सुरू झालेला हा सिनेसृष्टीतील कपूर परिवाराचा योगदानाचा प्रवास त्यांच्या चौथ्या पिढीतही अवरितपणे सुरू आहे. शोमन राज कपूर यांनी आर. के. फिल्मच्या बॅनरखाली अनेक हिट चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले. त्यांचा हा चित्रपटांचा वारसा खऱ्या अर्थाने जगला, पुढे चालवला तो म्हणजे त्यांचे धाकटे चिरंजीव ऋषी कपूर यांनी. ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचे आज, ३० एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आणि सर्वांच्याच मनात  सुरू झाला त्यांच्या सिने कारकिर्दीतील फ्लॅशबॅक. ‘बॉबी’ या १९७३ साली आलेल्या सुपरहिट चित्रपटातून ऋषी कपूर यांनी नायकाच्या भूमिकेत पदार्पण केले. मात्र ऋषी कपूर हे ‘बॉबी’ चित्रपटासाठी राज कपूर यांनी पहिली निवड नव्हतेच. खरंतर अपघाताने हा चित्रपट ऋषी कपूर यांनी मिळाला.


हेही वाचा – ऋषी कपूर यांच्या ‘या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडूंना झाला होता आनंद

- Advertisement -

‘मेरा नाम जोकर’च अपयश आणि आर्थिक संकट 

शोमन राज कपूर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘मेरा नाम जोकर’ हा १९७० साली प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी नायकाच्या किशोर वयातील भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्याला कारणही तसच होतं. थोडा सखोल अभ्यास केला की समजंत, ‘मेरा नाम जोकर’ का फ्लॉप ठरला. त्या काळी अभिनेता-दिग्दर्शक राज कपूर, अभिनेता देव आनंद आणि नव्याने प्रसिद्धी झोतात आलेले राजेश खन्ना, यांच्या चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर होती. राजेश खन्ना यांच्या ‘आराधना’ हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला आणि त्यांनी लागोपाठ नऊ सुपरहिट चित्रपट देत हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार हे बिरूद मिळवले. १९७० साली ‘मेरा नाम जोकर’ सोबतच देव आनंद यांचा ‘जॉनी मेरा नाम’ हादेखील प्रदर्शित झाला. त्यामुळे दोन चित्रपटांच्या शर्यतीत दोघांचेही नुकसान झाले. तेव्हाच्या काळी जर्मन कलाकारांना घेऊन, तसेच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज सिमी गरेवाल, मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘मेरा नाम जोकर’साठी राज कपूर यांनी सर्वस्व पणाला लावल होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि आर. के. फिल्म्सवर आर्थिक संकट ओढवले.


हेही वाचा – ‘एक गाडी में सवार दोनों सितारे,एक साथ सफर पर निकल पडे’

- Advertisement -

…आणि ऋषी कपूर रातोरात स्टार झाले 

‘मेरा नाम जोकर’मुळे झालेली निराशा झटकत राज कपूर यांनी पुन्हा चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवले आणि ‘बॉबी’ची पटकथा तयार झाली. खरंतर तेव्हाचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना घेऊन राज कपूर ‘बॉबी’ चित्रपट बनवणार होते. मात्र आर्थिक तंगीमुळे आणि राजेश खन्ना यांना साईन करण्यासाठीचे पुरेसे बजेट नसल्यामुळे घरातील सदस्याला त्यांनी नायक म्हणून उभा केला. त्यांचा मुलगा ऋषी कपूर यांना पहिल्यांदा नायकाच्या रुपात सिनेसृष्टीत ब्रेक मिळाला तो ‘बॉबी’मधून. हा ऋषी कपूर यांच्यासाठीही हा सुखद धक्का होता. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशामुळे राज कपूर यांना ‘बॉबी’ चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या आणि त्या सार्थकीही ठरल्या. ‘बॉबी’ चित्रपटाने युवकांना भूरळ घातली. डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर रातोरात स्टार बनले. राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीला नवा चेहरा दिला. ऋषी कपूर यांनी आपल्या अनेक मुलाखतींमधून या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले आहे की, खरंतर हा चित्रपट नायिकेच्या नावाने असून तिला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आला आहे. मात्र प्रेक्षकांना ‘बॉबी’मधला राज अधिक भावला. त्यातील गाणी ‘मैं शायर तो नही…’, ‘हम तुम एक कररे में बंद हो…’, ‘झूट बोले कौवा काटे…’, ‘अस्कर कोई लडका इस हाल में…’, तरुणांना वेड लावून गेली होती. ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम केल्यापासूनच ऋषी कपूर यांनी चाहत्यांना ऑटोग्राफ देण्याचा सराव सुरू केला होता. तो त्यांच्या कामी आला ते ‘बॉबी’ सुपरहिट ठरल्यानंतर. अखेर आर. के. फिल्म्सच्या आर्थिक तंगीमुळे राजेश खन्नाऐवजी ऋषी कपूर यांना ब्रेक मिळाला आणि सिनेसृष्टीला एक हरहुन्नरी कलाकार.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -