घरमुंबईमूल्यांकनातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

मूल्यांकनातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

Subscribe

मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीत चुका करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांकडून सतत होणाऱ्या चुकांमुळे पुनर्मूल्यांकनाला येणाऱ्या उत्तरपत्रिकांची संख्या वाढली आहे. शिवाय, या पूनर्तपासणीत उत्तरपत्रिकांचे गुण वाढत आहेत. त्यामुळे जे शिक्षक उत्तरपत्रिका तपासताना वारंवार चुका करतात, त्यांच्या पगारातून दंड कापून घेण्यात यावा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर पुनर्मूल्यांकनातून ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत, त्यांना पूनर्मूल्यांकनाची आकारण्यात आलेली शुल्क परत देण्यात यावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. विद्यापीठात विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात वायकर यांनी कलिना कॅम्पसमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु कुलकर्णी, कुलसचिव भिरुड, परिक्षा नियंत्रक घाटुळे, अभियंता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी कहार, सह संचालक, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, कारंडे, कोळंबकर तसेच विद्यापीठाच्या विभागातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – आयडॉल प्रवेशाचा सर्व्हर डाऊन

- Advertisement -

निकाल विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

गेल्या काही वर्षांमध्ये पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अर्ज केलेल्यांपैकी कित्येक विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत. निकाल विलंबामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संधींना मुकावे लागले आहे. त्याचबरोबर परदेशात शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या संध्या विद्यार्थ्यांना गमवाव्या लागल्या आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना नोकरी न मिळाल्यामुळे तर काहिंनी निकाल बघून आत्महत्या केली असल्याची माहिती सिनेट सदस्यांनी वायकर यांना दिली. वायकर यांनी परिक्षा कालावधीत विद्यापीठाचा परिक्षा विभाग २४ तास सुरु राहावे, असे आदेश दिले आहेत.

उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे गुण लिहिण्यास मनाई

आता महाविद्यालयांमध्ये परिक्षांचे मुल्यांकन होणार आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्याचे नाव न लिहिण्याचा नवा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहिर केला आहे. महाविद्यालयात मुल्यांकन होणार असल्यामुळे विद्यर्थ्यांचे नाव बघून गुणदान केले जाण्याची शक्यता सिनेट सदस्य प्रदिप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी वर्तवली होती. त्यामुले उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कारवाई होत नसल्याने पेपर तपासणीच्या चुकांमध्ये वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -