घरमुंबईशिक्षकांनाही वर्क फ्रॉम होम काम करू द्या - आ. निरंजन डावखरे

शिक्षकांनाही वर्क फ्रॉम होम काम करू द्या – आ. निरंजन डावखरे

Subscribe

शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती न करता प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत वर्क फ्रॉम होम करू द्यावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र लिहून केली आहे.

महापालिकेकडून 30 जूनपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली असली तरी शिक्षण निरिक्षक विविध कामासाठी शिक्षकांना शाळेत बोलवत आहेत. शिक्षणाधिकारी व शिक्षण निरिक्षक यांच्या आदेशामध्ये एकवाक्यता नसल्याने शिक्षकांचा गोंधळ उडत आहेत.त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीबाबत धोरण स्पष्ट करत शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित न राहण्याबाबत निर्देश जारी करून वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्री व मुख्य सचिवांकडे केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असून १५ जूनपासून अनेक ठिकाणी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना शिक्षणाधिकार्‍यांमार्फत दिल्या जात आहे. शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत त्यामध्ये कुठेही शिक्षकांनी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे असे म्हटलेले नाही. त्याऐवजी ऑनलाईन शिक्षण द्यावे अशा सूचना केलेल्या आहेत, परंतु राज्यातील शिक्षणाधिकारी चुकीचा अर्थ काढत शिक्षकांना शाळेत हजर राहण्याविषयी सांगतात. राज्यात अनलॉक जरी सुरू झाले असले तरी वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत, शाळेत विद्यार्थीच नसतील तर शिक्षकांनी शाळेत जाऊन काय करावे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती न करता प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत वर्क फ्रॉम होम करू द्यावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र लिहून केली आहे.

- Advertisement -

शिक्षणाधिकार्‍यांमध्ये समन्वय नाही

मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी ३० जूनपर्यंत मुंबईतील शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करून ऑनलाईन शिक्षण द्यावे असे आदेश शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत तर शिक्षण निरीक्षक शिक्षकांना वेतन देण्यासाठी उपस्थिती प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देत आहेत. ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जात आहे यामुळे शिक्षणाधिकार्‍यांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप भाजपा शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -