घरमुंबईनवी मुबंईतील ७५० सोसायट्यांना पालिकेकडून नोटीस

नवी मुबंईतील ७५० सोसायट्यांना पालिकेकडून नोटीस

Subscribe

नवी मुंबईतील ७५० सोसायट्यांना पालिकेकडून नोसाटी बजावण्यात आल्या आहेत. कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये रबवण्यात आला. मात्र, स्वच्छ भारत अभियान आल्यामुळे कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष झाल्या संबंधीत नवी मुंबईत येथे पालिकेने ७५० ते ८०० सोसायचट्यांवर नोटीस बजावल्या आहेत. स्वच्छ अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, या अभियानानंतर नागरिकांनी स्वच्छते कडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे. नवी मुंबई येथील सोसायटींना नोटीस दिल्या आहे. तसेच जो पर्यंत कचरा वेगवेगळा करून देत नाही तो पर्यंत कचरी उचलणार नाही असे सांगळ्यात आले आहे.

कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांवर कारवाई

स्वच्छ अभियानामध्ये पालिकेकडून नागरिकांना ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा हे बंधन कारक केले होते. तसेच आप आपल्या सोसायटीतील कचरा वर्गीकरण करण्याची जवाबदारी त्या-त्या सोसायट्यांना देण्यात आली होती, तसेच ज्या सोसायट्यांमध्ये जास्त कचरा साठत असेल तर त्यांना सोसायटीतच खत प्रकल्प राबवण्यासंबंधीत प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते. तसेच सोसायटांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या कचरा संकलनाचे डबे देण्यात आले आहेत. मात्र, येवढे असूनही स्वच्छता नागरिकांच्या अंगवळणी पडली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पालिकेने सुका आणि ओला कचरा वर्गीकरण न केल्याने सोसायट्यांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाई ही करण्यात येत आहे. २५० रूपये दंडाची कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -