घरमहाराष्ट्रघराची किंमत कमी केली नाही म्हणून कोयत्याने वार

घराची किंमत कमी केली नाही म्हणून कोयत्याने वार

Subscribe

खरेदी केलेले घर कमी किंमतीत देण्यास नकार दिल्याने माथाडी अध्यक्ष बबलू जोगदंड यांनी श्रीकांत सुर्वे यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बबलू जोगदंडसह आई, बहीण आणि एका अनोळखी साथीदारावर वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा महिन्यापूर्वी खरेदी केलेलं घर कमी किंमतीत देण्यास नकार दिल्याने कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडल्याचे समोर आली आहे. या घटनेत दहा वर्षीय मुलगी आणि तिची आई थोडक्यात बचावली आहे. तर श्रीकांत सुर्वे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष बबलू जोगदंडसह आई, बहीण आणि एक अनोळखी साथीदारावर यांच्यावर वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुटुंबावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी श्रीकांत जोगदंड यांनी दहा महिन्यापूर्वी घर खरेदी केले होते. तसेच त्यांचा एक गुंठ्यांचा मोकळा प्लॉट आहे. तो आरोपीला कमी किंमतीत हवा होता. मात्र ते देण्यास श्रीकांत यांनी नकार दिला याच रागातून त्यांनी सोमवारी रात्री श्रीकांत हे मुलीला खासगी शिकवणी वरून घरी घेऊन येत असताना आरोपी बबलूने श्रीकांत यांना अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केला. त्यानंतर दोघांचा वाद आपापसात वाद झाला. अगोदरच सुर्वे कुटुंब हे बबलूला खाबरून राहात होते. त्यात त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी बबलू जोगदंडने श्रीकांत यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला असता ते घराच्या दिशेने पळाले. त्यापाठोपाठ बबलू, आई, बहीण आणि एक अनोळखी इसम त्यांच्या मागे धावले. बबलूकडे सततूर आणि अनोळखी व्यक्तीकडे कोयता होता त्या दोघांनी श्रीकांत यांच्यावर वार केले तर त्यांच्या पत्नीला आणि मुलीला ढकलून देत त्यांनी श्रीकांतवर कोयत्याने हल्ला केला. मात्र श्रीकांत थोडक्यात बचावले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -