मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या तातडीने बोलावली बैठक

mns raj thackeray on visit to pune today and yesterday
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबईत उद्या (बुधवारी)  मनसेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. सध्या मनसेच्या नेत्यांची आऊटगोईंग सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर बैठक बोलावली असल्याचे समोर येत आहे.

मनसेला सध्या एका मागून एक मोठे झटके बसत आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अजून एका मनसे नेत्याने मनसेला रामराम केला आहे. आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे आता येत्या आगामी महापालिका निवडणूक तोंडावर असताना मनसेला खिंडार पडले आहे. म्हणून आता मनसेच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. उद्या सकाळी १० वाजता कुष्णकुंजवर राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मनसेचे पदाधिकारी असणार आहेत.

जेव्हा राजेश कदम यांनी मनसेला सोडचिट्ठी दिली त्यावेळेस मनसेचे आमदार राजू पाटी यांनी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आगामी निवडणुकीतील आमिषाला बळी पडून राजेश कदम यांना पक्ष सोडला असावा, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


हेही वाचा – डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार; शेकडो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन