शिवसैनिकांनो ‘हीच ती वेळ’, मनसेचे आवाहन

raj Thackeray and CM Uddhav Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे पक्ष पुन्हा एकदा पक्षाच्या विचारधारेची नवी मांडणी करणार आहे. २३ जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन गोरेगाव येथील नेस्को मैदानात होत असून, मनसे आता हिंदुत्वाची कास धरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर कडवे शिवसैनिक नाराज आहेत. या शिवसैनिकांना आता मनसेमध्ये सामील व्हा, असे आवाहन मनसे नेते अमय खोपकर यांनी केले आहे. “बाळासाहेबाच्या जयंतीला ‘मन’से सामील व्हा”, असे ट्विटच त्यांनी केले आहे.

काय म्हणाले ट्विट मध्ये

“पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी.. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा” असे अमय खोपकर म्हणाले आहेत.