घरमुंबईमल्टिप्लेक्सच्या मालकांना मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा!

मल्टिप्लेक्सच्या मालकांना मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा!

Subscribe

राज्य सरकारच्या आदेशानुसार आजपासून प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहे. परंतु, या निर्णयाचे अद्यापही पालन केले जात नसल्याचे 'माय महानगर'च्या सर्वेक्षणात समोर आले आहे. दरम्यान, मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना हा कायदा अंमलात आणण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला आहे.

मल्टिप्लेक्समध्ये १ ऑगस्ट म्हणजेच मंगळवारपासून प्रेक्षकांना बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. शिवाय मल्टिप्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थही छापील किंमतीतच मिळणार आहे. राज्यसरकारकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. जे मल्टिप्लेक्स हे आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. यासंबंधी ‘माय महानगर’ने आज मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये राज्य सरकारच्या या अध्यादेशाचे अद्यापही पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे.

मनसेने दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम

या विषयी बोलताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, ‘मल्टिप्लेक्स मालकांना सरकारने आदेश दिला होता. पण किती मल्टिप्लेक्सवाले आदेशाचं पालन करतात? मल्टिप्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थही छापील किंमतीत विकतायत का? याकडे मनसे चित्रपट सेना लक्ष ठेवून आहे. राज्य सरकारने या अगोदर मराठी चित्रपटांना प्राईम टाईम द्यावा असा अध्यादेश काढला होता. पण या थिएटर मालकांनी जुमानलं नव्हतं. पण आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करून हा निर्णय अंमलात आण्यासाठी भाग पाडले होते’. त्याचबरोबर मनसेकडून मल्टिप्लेक्स मालकांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

- Advertisement -

मनसेमार्फत खळ्ळखट्याक् आंदोलनाचा इशारा

या दोन दिवसानंतरही जर मल्टिप्लेक्स मालकांनी अध्यादेशांचे पालन केले नाही तर मनसेमार्फत खळ्ळखट्याक् आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ‘हे मल्टिप्लेक्सवाले सरकारच्या आदेशाचं पालन करतात का ते बघतो. या निर्णयाबाबत सरकारला सहकार्य केले नाही आणि जनतेला वेठीस धरले तर मनसेचे खळ्ळखट्याक् आंदोलन दिसेल’, असे अमेय खोपकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -