घरदेश-विदेशBihar Election 2020 : जमुई EVM मशीनमध्ये घोळ; RJD च्या उमेदवाराचा...

Bihar Election 2020 : जमुई EVM मशीनमध्ये घोळ; RJD च्या उमेदवाराचा आरोप, हे तर BJP चे कारस्थान

Subscribe

पहिल्या टप्प्यातील मतदानात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.४८ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारच्या दरभंगा मतदार संघातील राज मैदान येथे निवडणुकीच्या प्रचारातील भाषणाला सुरूवात

- Advertisement -

मतदानावेळी कोरोना विषाणूपासूनच्या बचावासाठीचे सर्व नियम पाळताना तसेच मतदानाचा उत्सव साजरा करतानाही पाहायला मिळाले.


बिहारमधील बालगुदर गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला असून मतदान केंद्र ११५ वर शुकशुकाट पाहायला मिळाला.


भाजप नेता प्रेम कुमार यांनी निवडणुकीच्या नियमांचे उल्लंखन केल्याचे आज पाहायला मिळाले. प्रेम कुमार हे तोंडाला कमल छाप लोगो पार्टी चिन्ह असलेले मास्क लावून दाखल झाल्याचे निदर्शनास आले.


नया गाव परिसरात जमुयी येथील भाजप उमेदवार तसेच शूटर श्रेयसी सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला.


बिहारमधील मंत्री प्रेम कुमार यांनी सायकलवरून येऊन गया येथील मतदान केंद्रावर वोट केले.


बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात सकाळी ८ वाजेपर्यंत ५ टक्के मतदान पार पडले


औरंदाबाद येथील मतदान केंद्र क्र. २१९ वर मतदारांची भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली.


जेहानाबाद येथील मतदान केंद्र क्र. १७० येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळासाठी मतदान थांबवण्यात आले.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिहारच्या लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.


केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणूक मतदानाबाबत ट्विट करत जनतेला कोरोना संकट काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आधी मतदान मग जलपान असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह लखीसराय येथील बडहिया मतदान केद्र क्र. ३३ वर मत देण्यास दाखल झाले. मात्र मतदानाआधीच तेथील मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले.


गया येथील मतदान क्रेंदावर मतदानास सुरूवात


बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या पट्ट्यातील मतदान होत असून १६ जिल्ह्यातील ७१ मतदारसंघांसाठी हे मतदान होणार आहे. एकूण १०६६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे.


लाखीसराई येथील मतदान केंद्र क्र. १६८ येथे मशीनमध्ये बिघाड


कोरोना संकटकाळातील हे पहिले मतदान होत असून त्यामुळे सर्व खबरदारी घेतली जात आहे.


मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मुंगेर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची पाहणी करताना अधिकारी


राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी लोकांना योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


काही वेळातच मतदानाच्या प्रक्रियेला सुरूवात होईल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या पट्ट्यातील मतदान आज, बुधवारी होत असून १६ जिल्ह्यातील ७१ मतदारसंघांसाठी हे मतदान होणार आहे. सकाळपासूनच लोकांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. बिहारमधील तब्बल २.१४ कोटी जनता आज १०६६ उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद करणार आहेत. कोरोनाच्या संकटकाळातील हे मतदान देशात होत असून त्या पार्श्वभूमीवरही मतदान केंद्रावर विशेष काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्र सॅनिटाईज करून घेतली जात असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगचेही नियम पाळण्यास सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -