Hot फोटोनांही मिळत नव्हत्या लाईक्स; वेट्रेस तरुणीची आत्महत्या

फेसबुक पोस्टला जास्त लाईक्स न मिळालेल्या एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार लांटेस्टर येथील असून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव क्लोय डेव्हिसन असे आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राहत्या घरात पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत क्लोयचा मृतदेह आढळला होता. मात्र सुसाईड नोट न मिळाल्याने यामागील कारण स्पष्ट झाले नव्हते. अखेर आता तब्बल आठ महिन्यांनी या कारणाचा उलगडा झाला असून फेसबुक पोस्टला कमी लाईक्स मिळाल्याने क्लोय हिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

क्लोय डेव्हिसन हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होती. दिसायला सुंदर असलेली क्लोय रोज सोशल मीडियावर फोटो अपलोड करायची. आत्महत्या करण्यापूर्वी तिने काही फोटो अपलोड केले होते. मात्र त्याला फारसे लाईक्स मिळाले नव्हते. फेसबुक पोस्टला लाईक कमी मिळाल्याने क्लोय तणावात असायची, असे तिच्या मित्रांनी सांगितले. आत्महत्या करण्याआधी देखील तिने मित्रांना फोन करून मला कोणी पसंत करत नाही, मी कोणालाही आवडत नाही, असे म्हणाली होती. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केलेल्या क्लोयच्या आईने तिच्या मृत्यूनंतर तरूणांना जागरूक करत असून व्हर्च्युअल जगात वावरू नका, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा –

Sushant Case : सीबीआयची टीम सुशांतच्या घरी दाखल; सखोल तपास सुरू