घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात राज ठाकरेंनी केले फेरबदल

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात राज ठाकरेंनी केले फेरबदल

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी पक्षात मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या दृषीने फेरबदल केले आहेत. राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात फेरबदल केले आहेत. माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवत मनसे उपाध्यक्ष संजय जामदार यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत मनसेने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात महत्त्वाचे बदल केले आहेत. वरळी मतदारसंघाची जबाबदारी संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी यापूर्वी मनसेकडून वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता

ठाकरे कुटुंबात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीने निवडमूक लढवली आहे. आदित्य ठाकरे २०१९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिथे आघाडीतर्फे राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता, मात्र मनसेने ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नव्हता. याविषयी निवडणूक काळातच राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -