घरमुंबईफडणवीस सरकारचा 'मनोरा' पुनर्बांधणीचा निर्णय, तर मोदी सरकारच्या NBCC कडून किंमत निश्चित...

फडणवीस सरकारचा ‘मनोरा’ पुनर्बांधणीचा निर्णय, तर मोदी सरकारच्या NBCC कडून किंमत निश्चित – काँग्रेसचा गौप्यस्फोट

Subscribe

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मनोराचे कंत्राट ६०० कोटीवरून ९०० कोटींवर कसे गेले? हा ३०० कोटींचा अतिरिक्त गफला कुणाचा?, असा थेट सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. यानंतर आता कॉंग्रसकडून देखील मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची किंमत ठरवली आहे. असा गौप्यस्फोट करतानाच राज्यातील आघाडी सरकारवर भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपने त्वरीत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. रविवारी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपचा पर्दाफाश केला आहे.

सावंत यांनी ट्वीट करून भाजपावर केली टीका

”मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या एनबीसीसीला काम दिले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रकल्प किंमत ९०० कोटी कशी आली ही माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली.”

- Advertisement -

यासह सावंत असेही म्हणाले की, मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीने अकार्यक्षमतेकरिता काढले जाण्यापूर्वी २८ फेब्रुवारी २०२० ला विधिमंडळाला दिलेल्या ई-टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्प किंमत ८१० कोटी सांगितली. नंतर ८ डिसेंबर २०२० रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत अंदाजपत्रकात ८७५.६२ कोटीं इतकी वाढवली. आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोना बाबतीत भाजपाकडून सतत राज्यसरकारवर टिका होत आहे. तसेच नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवासाचा पुनर्विकास आता अखेर मार्गी लागला आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मंगळवारी ९०० कोटी रुपयांची निविदा मागवली आहे. त्यानंतर भाजपाकडून सत्ताधारी पक्षावर राज्याचा खर्च वाढत चालला आहे, असा आरोप करण्यात आला. याला देखील दोन दिवसांपूर्वी सचिन सावंत यांनी उत्तर दिले.

“शहेनशहा मोदींचा चेहरा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपाने बेफाम आरोप केला आहे. मनोरा दुरुस्त करता आला असता, परंतु फडणवीस सरकारच्या काळात त्यातही घोटाळा झाला. म्हणून शहेनशहाला वाचवण्यासाठी व भाजपा आमदारांना दरमहा मिळणाऱ्या पैशांसाठी आरोप करु नका”, असे सावंत यांनी बजावले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -