घरताज्या घडामोडीArnab Goswami यांच्या अडचणी वाढणार; महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याबद्दल गुन्हा दाखल!

Arnab Goswami यांच्या अडचणी वाढणार; महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याबद्दल गुन्हा दाखल!

Subscribe

रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे राज्यभर आणि देशभरात समर्थन आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच आता अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणि महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५३ अर्थात सरकारी कामात अडथळा आणणे आणि ३५३, ५०४, ५०६, ३४ कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनात भाजपनं मोहीमच उघडली असून त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर घाला असल्यचाा सूर भाजपनं आळवला आहे.


हेही वाचा – भाजपचं केंद्रीय मंत्रिमंडळ Arnab Goswami च्या पाठिशी, ९ मंत्र्यांनी केला अटकेचा निषेध!

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांना अटक करायला आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचाच विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी सध्या वाढताना दिसत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -