घरमुंबईमोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू

मोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू

Subscribe

गेल्या १० महिन्यांपासून बंद पडलेले मोनो रेल पुन्हा धावली आहे. पहाटे सहा वाजता चेंबूर आणि वडाळा या दोन्ही स्थानकावरुन मोनो रेल सोडण्यात आली. मोनोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या १० महिन्यापासून बंद असलेली मोनो रेल्वे अखेर मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. ९ नोव्हेंबर २०१७ ला मोनो रेलच्या कोचला आग लागली होती. तेव्हापासून मोनो रेल सेवा बंद होती. शनिवारी पहाटे सहा वाजल्यापासून चेंबूर ते वडाळा मोनोरेल अखेर सुरु झाली आहे. मोनो पुन्हा सेवेत आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

आजपासून मोनो पुन्हा सुरु

शनिवारी सकाळी सहा वाजता वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकावरुन पहिली मोनोरेल सुटली. १० महिन्यापासून बंद असलेली मोनो पुन्हा सेवेत आल्यामुळे प्रवाशांना आनंद झाला. मोनोची सेवा रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहणार असून दर पंधरा मिनिटांनी मोनोची फेरी असेल तसंच दिवसाला मोनो रेल १३० फेऱ्या मारणार आहे.

mono rail time table
मोनो रेल वेळापत्रक

देशातील पहिली मोनोरेल

मुंबईमध्ये सुरु झालेली मोनो रेल ही देशातील पहिली मोनो रेल आहे. १ फेब्रुवारी २०१४ ला मोनो रेल सुरु झाली होती. चेंबूर ते वडाळा या मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. मोनो रेलच्या पहिल्या टप्प्यावरुन दिवसारा १८ ते २० हजार प्रवासी प्रवास करायचेय मोवो रेल सेवे बंद झाल्यामुळे महिन्याला एमएमआरडीएचे १ कोटी ८० लाख रुपयांचे नुकुसान होत होते.

- Advertisement -

मोनो रेलचा दुसरा टप्पा २०१९ मध्ये होणार सुरु

पुढच्या वर्षी मोनो रेलचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. मोनोचा दुसरा टप्पा पूर्ण व्हायला २०१९ उजाडेल असा अंदाज एमएमआरडीएमार्फत बांधण्यात आला आहे. २ फेब्रुवारी २०१९ ला मोनो रेलचा दुसरा टप्पा जीटीबी नगर ते जेकब सर्कल सुरु होईल अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त आर.ए राजीव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -