घरCORONA UPDATEमान्सून सरासरीपेक्षा जास्तच; संपुर्ण राज्यात जूनचा कोटा पुर्ण

मान्सून सरासरीपेक्षा जास्तच; संपुर्ण राज्यात जूनचा कोटा पुर्ण

Subscribe

राज्यातील बहुतांश भागात मान्सूनची हजेरी मुसळधार अशीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संपुर्ण राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक असा पाऊस झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईने जाहीर केली आहे. काही भागातील तुरळक अपवाद वगळला तर मान्सूनने संपुर्ण राज्यात १७ जूनपर्यंत चांगली हजेरी लावली आहे. राज्यातील बहुतांश भागात मान्सूनची हजेरी मुसळधार अशीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अकोला व यवतमाळ या दोन ठिकाणी सरासरी इतका पाऊस मान्सूनच्या आगमनापासून झालेला आहे. पण राज्यातील इतर भागात मात्र मान्सून हा सरासरीपेक्षा अधिकच असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

जून महिन्यात होणाऱ्या मान्सूनपैकी ६० टक्क्यांहून पाऊस झाल्याची नोंद ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पहायला मिळाली आहे. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, मालेगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर २० टक्के ते ५९ टक्के इतका पाऊस हा पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा आणि गोंदिया यासारख्या राज्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अतिरिक्त ते तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. पण मुंबई आणि परिसरामध्ये मात्र मान्सूनची अद्यापही मोठी हजेरी लागलेली नाही. राज्यात जूनचा मान्सूनचा कोटा भरून काढण्यात यंदा निसर्ग चक्रीवादळाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पावसाची सरासरी मोठ्या प्रमाणात ओलांडण्यासाठी मदत झाली आहे. गेल्या पंधरवड्यात काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १४२ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर अहमदनगरमध्ये सरासरीच्या १७६ टक्के जास्त, नाशिकमध्ये सरासरीच्या १५३ टक्के जास्त आणि जळगावमध्ये सरासरीच्या १५९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -