घरमुंबईMonsoon Update : मान्सून अखेर केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी?

Monsoon Update : मान्सून अखेर केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी?

Subscribe

मुंबई : मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) मोठी अपडेट दिली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळं १६ जूननंतर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. पण हवामानात मोठे बदल झाल्यामुळे मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा केली आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी साधारणपणे 7 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील सात दिवसात म्हणजे 16 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. गेल्या 12 वर्षांचा अभ्यास केल्यावर समजते की, मान्सून महाराष्ट्रात दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान दाखल झाला आहे. मात्र महाराष्ट्रात मृग नक्षत्राला दाखल होणाऱ्या मान्सूनचे समीकरण यावेळी बदलेले आहे. मान्सून आज दाखल झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे, तसेच केंद्र सरकार समोरील देखील चिंता आता दूर झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -