घरठाणेशंभराहून जास्त चोरट्यांनी केली वीस लाखांची एक लाख युनिटची वीजचोरी

शंभराहून जास्त चोरट्यांनी केली वीस लाखांची एक लाख युनिटची वीजचोरी

Subscribe

२०२३ च्या जानेवारी महिन्यात वीजचोरी करणाऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा शॉक देऊनही त्यांना झटका न बसल्याने अखेर या वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहापूर तालुक्यातील वासिंद, खर्डी आणि कसारा परिसरातील शंभराहून अधिक ग्राहकांनी तब्बल २० लाखाची एक लाख युनिट वीज चोरी केली असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडसत्रात उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

वीजचोरी करणाऱ्यांवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची धाडसत्र मोहीम सुरू असून जानेवारी महिन्यात तालुक्यातील आसनगाव, कसारा, खर्डी, वासिंद परिसरातील पाटोळ, शिरोळ, अंबर्जे, बलवंडी, बेलवड, बेंडेकोन येथील १०० हुन अधिक ग्राहकांनी वीज चोरी केल्याचे उघडकीस आले होते. या वीज चोरांनी तब्बल २० लाखाची एक लाख युनिटची वीज चोरी केली असून त्यांना संबंधित रक्कम भरण्याची १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र दिलेल्या मुदतीत विजदेयके न भरल्याने या वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे शहापुरचे वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले. वासिंद, खर्डी, कसारा शहापूर येथील अविनाश कटकवार यांसह संबंधित कनिष्ठ अभियंता, कर्मचारी, लाईनमन आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान, वीज ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कैलास भरोदे
शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -