घरमुंबईमुंबई पोलीस दलात आणखी ५ सेगवे दाखल

मुंबई पोलीस दलात आणखी ५ सेगवे दाखल

Subscribe

ऑगस्ट २०१७ मध्ये मुंबई पोलीस दलात नवीन उपक्रम हाती घेण्यात आला. मरीन ड्राईव्ह परिसरात गस्त घालणे सोयीचे व्हावे म्हणून सेगवे घेण्यात आले. मुंबई पोलिसांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच ते नीट चालत नसल्याच्या तक्रारी यायला सुरुवात झाली. अशातच नव्याने आणखी पाच सेगवे मुंबई पोलीस दलात आल्याने त्यांचा फायदा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वांद्रे, वरळी सीफेस, वर्सोवा बिच, मरीन ड्राईव्ह हे मुंबईतले महत्त्वाचे समुद्रकिनारे म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी तरुणाईबरोबरच अनेकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असतो. २०१७ मध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मरीन ड्राईव्ह समुद्रकिनार्‍यावर पोलिसांना गस्त घालणे सोपे जावे म्हणून अशाप्रकारचे चार सेगवे आणण्यात आले. यासाठी ते सेगवे चालवणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. पण, अवघ्या सहा महिन्यातच हे सेगवे नीट चालत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. या सेगवे मशिन्सची बॅटरी नीट चालत नसल्याने ते पुरेशा वेळा काम करत नसल्याचे समोर आले.

- Advertisement -

पण, परदेशी बनावटीच्या या सेगवेची अशी तक्रार असतानादेखील मुंबई पोलिसांसाठी नव्याने पाच सेगवे मशिन्स मागवण्यात आल्या आहेत. वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड, वरळी सीफेस, वर्सोवा बीच याठिकाणी गस्त घालण्यासाठी हे सेगवे पोलीस वापरणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात आता एकूण ९ सेगवे दाखल झाले असून, त्यांचे काम कशाप्रकारे चालणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सेगवे मशिन्स नक्की आहेत कशा
परदेशी बनावटीच्या या सेगवे मशिन्सवर मुंबई पोलिसांचा लोगोदेखील आहे. वॉकी टॉकी, किरकोळ साहित्य ठेवण्यासाठी बॉक्स आणि एक माणूस उभे राहू शकेल इतकी या सेगवेची क्षमता आहे. या सेगवेंची बॅटरी पुरत नसल्याने ते मध्येच बंद पडत असल्याची तक्रार या आधी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडून करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -